• Sat. Sep 21st, 2024
भाजप प्रवेशावर एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया, सर्व चर्चांना पुर्णविराम देत म्हणाले- लवकरच…

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांचा भारतीय जनता पक्षातील प्रवेश निश्चित झाला असून त्यांनीच आज याबाबत प्रसार माध्यमांना माहिती दिली आहे. एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा होत होत्या. या चर्चांना आता त्यांनी पुर्णविराम दिला आहे. आज त्यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना आपण भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे.
भाजपच्या शिलेदारांचा कोल्हेंना रामराम, माजी उपनगराध्यक्ष – नगरसेविकेचा अजितदादा गटात प्रवेश
काही दिवसांपूर्वीच एकनाथ खडसे यांनी दिल्ली गाठत यासंदर्भात पक्ष नेतृत्वासोबत चर्चा केली होती. मात्र स्थानिक नेत्यांचा तसेच काही मातब्बर भाजप नेत्यांचा विरोध पाहता त्यांचा पक्षप्रवेश लांबला. मात्र आज महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन सोबत बोलताना त्यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चांना विराम देत लवकरच स्वगृही परतणार असल्याचं म्हटलं आहे. याबाबत महाराष्ट्र टाइम्सला माहिती देताना एकनाथ खडसे म्हणाले की, आज सायंकाळी ते जळगावला रवाना होत आहेत. उद्या मुक्ताईनगर जळगावमध्ये कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून राजकीय भूमिका स्पष्ट करतील.

पंकजा मुंडे, जानकरांना आमचा विरोध नाही पण भुजबळांना पाडणारच, मराठा समाजाचा इशारा

दुसरीकडे भाजपचे गिरीश महाजन यांच्यासोबत एकनाथ खडसे यांचे संबंध चांगले नाहीत. मात्र त्यांनी मन की बात करत एकंदरीतच जुळवून घेत आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचे काम करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. दरम्यान परत एकदा लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमार्फत करेक्ट कार्यक्रम करत शरद पवारांना धक्का बसला आहे. यापूर्वी त्यांची सून खासदार रक्षाताई खडसे यांनी देखील वेट अँड वॉच असे वक्तव्य केल्यामुळे भाजपमध्ये प्रवेश करण्यात करणार असल्याचे संकेत दिले होते. त्यानुसार आज प्रत्यक्ष आमदार एकनाथराव खडसे यांनीच आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed