• Mon. Nov 25th, 2024
    धैर्यशील मोहिते-पाटलांच्या फलटणमध्ये गाठीभेटी, शरद पवारांचा निरोप- लवकर निर्णय घ्या!

    संतोश शिराळे, सातारा : उमेदवारीबाबत बहुप्रतिक्षेत असलेल्या माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार हा फलटणकर किंवा अकलूजकर त्यांच्यापैकी एक असणार आहे. माढा उमेदवारी जवळजवळ निश्चित झाली असून, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तुतारी हाती घेऊन रणशिंग फुंकणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवारीचा तिढा सुटणार असून, महायुतीला मोठा दणका बसण्याची शक्यता आहे.गुढीपाडव्यादिवशी तुतारी हातात घेण्याचा निर्णय झाला असून याच दिवशी उमेदवाराची घोषणा होऊन दि. १२ किंवा १३ रोजी माढा लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. मात्र, उमेदवारीचा निर्णय हा निंबाळकर आणि मोहिते-पाटील कुटुंबीयांनी घ्यायचा आहे, असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी सांगितले असल्याचे सूत्रांकडून समजते.
    मोहिते पाटलांची शरद पवारांना साद, गुढीपाडव्याला ‘तुतारी’ फुंकणार? माढ्यातून उमेदवारीची चिन्हं

    लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फलटण येथे सह्याद्री कदम यांच्या निवासस्थानी भेट देत धैर्यशील मोहिते-पाटील यांनी कदम यांच्याशी संवाद साधून भोजन केले. यावेळी माढा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जनतेला अपेक्षित असणारी भूमिका आपण लवकरच जाहीर करणार असल्याची माहिती धैर्यशील मोहिते-पाटील यांनी सांगितली.
    शरद पवार माढ्यात डाव टाकणार? बडा नेता दोनदा भेटीला, दिल्लीत चर्चा; लवकरच निर्णय होणार

    धैर्यशील मोहिते-पाटलांच्या फलटणमध्ये गाठीभेटी

    दरम्यान, अकलूजच्या मोहिते-पाटलांची स्वर्गीय माजी आमदार चिमणराव कदम यांचे पुत्र सह्याद्री कदम यांच्या साथीने फलटणमध्ये वाहनातून मुक्त सवारी केली. धैर्यशील मोहिते-पाटील यांनी आज विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक- निंबाळकर यांचे बंधू व फलटण बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्यासमवेत भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांचे बंधू आणि शिवसेना नेते शेखर गोरे यांची भेट घेतली. या अचानक भेटीमुळे फलटण शहर व तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे.

    यावेळी माढा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारी व त्यांच्या भूमिकेबाबत त्यांना छेडले असता जनतेला अपेक्षित असलेली भूमिका लवकरच जाहीर करू, अशी प्रतिक्रिया धैर्यशील मोहिते-पाटील यांनी दिली दिली. यावेळी सह्याद्री कदम, सौ. चाहत सह्याद्री कदम यांची उपस्थिती होती.
    श्रीनिवास पाटलांची निवडणुकीतून माघार; कार्यकर्ते म्हणतात, ‘राजेंविरुद्ध पवार साहेबांनी उतरावं’

    माढा लोकसभा मोहिते-पाटील हे लढविणार असल्याची जोरदार चर्चा असल्याने या मतदारसंघातील वातावरण तापले आहे. जर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते-पाटील अशी लढत झाली, तर भाजपसाठी ही निवडणूक सोपी ठरणार नाही, असा अंदाज राजकीय निरीक्षकांमधून व्यक्त केला जात आहे. धैर्यशील मोहिते-पाटील व त्यांचे अन्य कुटुंबीय देखील माढा मतदारसंघात गाठीभेटींसाठी बाहेर पडल्याने त्यांच्या भूमिकेविषयी लोकांमध्ये आतुरता आहे.
    भाजपला विरोध करत शिंदेंच्या शिलेदाराचा राजीनामा; तुतारी हाती घेण्याचा निर्णय, BJP विरोधात लढणार म्हणत दंड थोपटले

    राष्ट्रवादीकडून माढ्याचा उमेदवार जाहीर करण्याची औपचारिकता बाकी

    त्यातच विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे नाईक- निंबाळकर यांचेही नाव चर्चेत आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा माढा लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार ठरवताना फलटणकर आणि अकलूजकर यांनी उमेदवारीबाबत निर्णय घ्यावा, असे स्पष्ट शरद पवार यांनी सांगितले आहे. राष्ट्रवादीकडून माढ्याचा उमेदवार जाहीर करण्याची औपचारिकता बाकी असून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर घोषणा करण्यात येईल असे समजते.

    सुखाची तुतारी वाजो, दिलीप मोहिते पाटलांच्या पुतणी-जावयाला अमोल कोल्हेंच्या खास शुभेच्छा

    फलटणमध्ये आज धैर्यशील मोहिते पाटील यांनी अचानक सह्याद्री कदम यांची निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. तसेच फलटण भागातील काही लग्न समारंभांना हजेरीही लावली. त्यामुळे महायुतीतील कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या असून, आगामी काळात तालुक्यात मोठी राजकीय उलथापालथ होणार का? या दोन्ही घडामोडींच्या निमित्ताने चर्चेला उधाण आले आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed