• Sat. Sep 21st, 2024
देवदर्शनाहून परतताना वाराणसीतील कुटुंबावर काळाचा घाला, भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू

शुभम बोडके पाटील, नाशिक: नाशिक शहरालगत असलेल्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाजवळ भीषण अपघाताची घटना घडली आहे. नाशिक दिंडोरी मार्गावर बोलेरो गाडी आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातात एकूण पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास हे दुर्दैवी घटना घडल्याची माहिती समोर आली असून या अपघातातील जखमींना नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या भीषण अपघातात बोलेरो गाडीचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
नाशकात तीव्र पाणीटंचाई, पाण्यासाठी नागरिकांची पायपीट, मायबाप सरकार प्रचारातून वेळ मिळाला तर इकडे थोडं लक्ष द्या….
समोरच्या बाजूने येणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचवत असताना बोलेरो चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने बोलेरो गाडी थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडावर जाऊन आदळली. बोलेरो गाडी आणि रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीमध्ये अपघात झाला. बोलेरो गाडीने दोन ते तीन पलटी घेतल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितला. हा अपघात इतका भीषण होता की, अपघातात पाच जण जागीच ठार तर, चार जण गंभीर जखमी झाले आहेत. तर बोलेरो गाडी पूर्णपणे चक्काचूर झाली आहे. अपघातग्रस्तांमध्ये वाराणसीचे यादव कुटुंबियांचा समावेश होता. देवदर्शनाहून परताना त्यांच्यावर काळाने घाला घातला आहे.दरम्यान, नाशिक-दिंडोरी रस्त्यावरील विज्ञान विद्यापीठ परिसरात हा अपघात घडला आहे. या अपघातात वणी गडावरून येणारे भाविक असल्याची देखील माहिती समोर येत आहे. दुचाकीस्वार देखील जागेवर ठार झाला आहे. बोलेरो गाडी वेगात असल्याने दुचाकी वाहन चालक रस्ता ओलांडत असताना हा अपघात झाल्याची स्थानिकांनी माहिती दिली आहे. अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. स्थानिकांनी जखमी अपघातग्रतांना मदत करत रुग्णालयात रवाना केले आहे.

शेकाप नेत्या मीनाक्षी पाटलांचं निधन; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुटुंबाच्या सांत्वनपर भेटीसाठी रायगडला

अपघात घडल्यानंतर स्थानिकांच्या वतीने घटनास्थळी मदत कार्य राबविण्यात आले पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेहांचा पंचनामा करून जिल्हा शासकीय रुग्णालयात शव विच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. घटनास्थळी बघणाऱ्यांची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. अपघात झाल्यानंतर काही काळ नाशिक दिंडोरी मार्गावर वाहतूक देखील खोळंबली होती. मात्र पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed