ऐनवेळेवर वंचित बहुजन आघाडीने सुभाष पवार यांच्या जागेवर अभिजीत पवार यांना उमेदवारी घोषित केली. वेळेवर त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, मात्र आज अर्ज छाननीत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांचा अर्ज रद्द केला आहे. त्यामुळे वंचितला मोठा धक्का बसला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी गुरुवारी ४ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. या शेवटच्या दिवशी वंचितचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर यांनी आधी दिलेल्या सुभाष पवार या उमेदवाराच्या जागेवर अभिजीत राठोड यांना उमेदवारी दिली. त्यांनी वेळेवर अर्ज दाखल केला. मात्र, आज त्यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला आहे. त्यामुळे यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदारसंघात वंचितला मोठा धक्का बसला आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नामांकन अर्ज रद्द केल्याने अभिजीत राठोड हे आक्षेप नोंदवणार की वंचित बहुजन आघाडी कोणाला पाठिंबा देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.