• Sat. Sep 21st, 2024

हजयात्रेच्या नावाखाली भाविकांची ८६ लाखांची फसवणूक, नागपुरात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

हजयात्रेच्या नावाखाली भाविकांची ८६ लाखांची फसवणूक, नागपुरात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

म. टा. प्रतिनिधी, नागपूर : हजयात्रेच्या बहाण्याने भाविकांची ८२ लाखांनी फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी जुनी कामठी पोलिसांनी तिघांविरुद्ध कट रचून फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला.

काय आहे प्रकरण?

नसीम अख्तर मोहम्मद हनिफ (वय ६९, रा. बुनकर कॉलनी, कामठी), अब्दुल अजीज शकील अहमद (वय ४२, रा. मर्चंटनगर, मालेगाव), मोहम्मद असलम हफीज अब्दुल अजीज (वय ६०, रा. लकडगंज) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. नूर मोहम्मद कलीम अख्तर अन्सारी (वय ४२, रा. फुटाणाओळ, कामठी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. नूर यांचे अल हिजाज अॅण्ड उमराह टूर्स आहे. नसीम हा तयबा हज अॅण्ड उमराह टूर्स कंपनीचा एजंट आहे. नूर यांना भाविकांना हजयात्रेला पाठवायचे होते. त्यांनी भाविकांकडून घेतलेले ८५ लाख ८५ हजार रुपये रनाळा येथील बँकेच्या खात्यातून तयबाच्या बँक खात्यात पाठविले.
नियुक्तीपत्र टेक्निशयनचे पण काम दिले प्लम्बिंगचे, कंपनीकडून इंजिनिअरची फसवणूक
पैसे जमा झाल्यानंतरही या कंपनीने भाविकांना हजयात्रेला पाठविले नाही. नूर यांनी पैसे परत मागितले असता आरोपींनी कट रचून त्यांच्याविरोधातच पोलिसांत तक्रार केल्या. नूर यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या आदेशानंतर कामठी पोलिसांनी कट रचून फसवणूक केल्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed