मुंबई : मुंबईत दोन वर्षांनंतर पुन्हा क्लीनअप मार्शलची मोहीम सुरू करण्यात आली असून, बुधवारी पहिल्याच दिवशी अस्वच्छता करणाऱ्यांना जोरदार दणका देण्यात आला आहे. ए विभागातील फोर्टमध्ये १५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये दोन हजार ८०० रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
‘क्लीनअप मार्शल’चा पुरवठा करणाऱ्या संस्थेच्या कंत्राटाची मुदत दोन वर्षांपूर्वी संपल्यानंतर, सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांविरोधात कारवाई थांबली होती. बुधवारपासून ए विभागात प्रायोगिक तत्त्वावर पुन्हा ही कारवाई सुरू झाली आहे. अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात येत आहे. कारवाईत उघड्यावर थुंकणे, अस्वच्छता करणे आदींसाठी १०० ते १००० रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. या कारवाईसाठी पालिकेच्या आयटी विभागाने ऑनलाइन अॅपद्वारे दंडाची रक्कम वसूल करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी क्लीनअप मार्शलकडे मोबाइल ब्ल्यूटूथवर चालणारा छोटा प्रिंटरही देण्यात आला आहे. या प्रिंटरद्वारे दंडाच्या रकमेची पावती दिली जात आहे. दंडाची रक्कम ही क्लीनअप मार्शल संस्थेच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. दंडाची अर्धी रक्कम महापालिका, तर अर्धी रक्कम कंत्राटदाराला मिळणार आहे.
असा असेल दंड (रु.)
थुंकणे २००
आंघोळ १००
लघवी करणे २००
शौचास बसणे १००
प्राणी/पक्ष्यांना अन्न/दाणे ५००
गाडी धुणे १०००
कपडे धुणे २००
अस्वच्छ अंगण वैयक्तिक १,०००/सोसायटी १०,०००
कचरा वर्गीकरण वैयक्तिक १००/सोसायटी ५००
बायो वेस्ट वैयक्तिक १००/संस्था, रुग्णालये १,००० ते १०,०००
बायो वेस्ट मार्गदर्शक तत्त्वानुसार विल्हेवाट नसल्यास २०,०००
बांधकाम राडारोडा २०,०००
मंडयांमध्ये अस्वच्छता १,०००
फेरीवाले ५००