• Sat. Sep 21st, 2024

रेल्वेप्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आता नंदीग्राम एक्सप्रेस धावणार दादरपर्यंतच, ‘या’ ट्रेन्सचेही रुट बदलले

रेल्वेप्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आता नंदीग्राम एक्सप्रेस धावणार दादरपर्यंतच, ‘या’ ट्रेन्सचेही रुट बदलले

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : ऐन उन्हाळी सुट्ट्या सुरू होताच रेल्वेच्या विविध कामांमुळे महत्त्वाच्या रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम होत आहे. आगामी २७ दिवस नंदीग्राम एक्सप्रेस दादरपर्यंतच चालवण्यात येणार आहे. याशिवाय धर्माबाद-मनमाड ही रेल्वेही अंशत: रद्द करण्यात आली आहे.

रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे क्रमांक १७६८८ ही धर्माबाद-मनमाड मराठवाडा एक्सप्रेस तीन, सात आणि दहा एप्रिलला धर्माबाद ते नांदेड दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. वरील तिन्ही दिवस ही रेल्वे धर्माबादऐवजी नांदेड येथून सुटणार आहे. रेल्वे क्रमांक १७६५० ही छत्रपती संभाजीनगर-हैदराबाद एक्स्प्रेस नऊ एप्रिलला उशिरा सोडण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली होती. मात्र, नऊ एप्रिलला छत्रपती संभाजीनगर- हैदराबाद ही रेल्वे वेळेवर सुटणार आहे.

रेल्वे क्रमांक ११४०२ आदिलाबाद ते मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस ही एक एप्रिल ते २८ एप्रिलदरम्यान दादरपर्यंतच धावेल. ही रेल्वे आगामी २७ दिवसांसाठी दादर ते मुंबई सीएसएमटी दरम्यान अंशतः रद्द असेल, अशीही माहिती नांदेड विभागाकडून देण्यात आली आहे.

‘नांदेड-एरोड’ला मुदतवाढ

रेल्वे क्रमांक ०७१८९ नांदेड ते एरोड या विशेष रेल्वेला पाच एप्रिल ते २८ जून दरम्यान मुदतवाढ देण्यात आली आहे. रेल्वे क्रमांक ०७१९० एरोड ते नांदेड विशेष रेल्वेला सात एप्रिल ते ३० जूनदरम्यान मुदतवाढ देण्यात आली आहे.
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये फिरण्याचा प्लॅन? पुण्यातून सुटणाऱ्या ‘या’ रेल्वेंचे जूनपर्यंतचे बुकिंग ‘फुल्ल’
‘नांदेड-श्रीगंगानगर’चा मार्ग बदलला
उत्तर रेल्वेमध्ये लाइन ब्लॉकची कामे हाती घेण्यात आली आहे. यामुळे नांदेड-श्रीगंगानगर या रेल्वेचा मार्ग बदलण्यात आला आहे.

मार्ग बदलून धावणाऱ्या रेल्वे

१२४३९ नांदेड श्रीगंगानगर २८ एप्रिल जाखल, माणसा, भटिंडा-संगरूर, धुरी, बर्नाला, रामपुरा पूल
१२४८५ नांदेड श्रीगंगानगर २५ ते २९ एप्रिल जाखल, माणसा, भटिंडा-संगरूर, धुरी, बर्नाला, रामपुरा पूल
१२४८६ श्रीगंगानगर नांदेड २७ ते ३० एप्रिल भटिंडा, माणसा, जाखल, रामपुरा पूल, बर्नाला, धुरी, संगरूर
१२४४० श्रीगंगानगर नांदेड २६ एप्रिल भटिंडा, माणसा, जाखल, रामपुरा पूल, बर्नाला, धुरी, संगरूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed