अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून उमेवारीवरून भाजप अंतर्गत निर्माण झालेले मतभेद मिटविण्यात पक्षाच्या नेत्यांना आता यश येताना दिसत आहे. खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार प्रा. राम शिंदे यांनी आज जामखेडमध्ये कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यामध्ये दोघांनीही आमच्यातील मतभेद मिटल्याचे जाहीर करून कार्यकर्त्यांना एकत्रित कामाला लागण्याचे आवाहन केले आहे.राज्यभर मतभेदाची चर्चा झाल्यानंतर आता शिंदे यांच्या मतदारसंघातच दोघांनी एकत्र येत मतभेद मिटल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. या दोघांतील मतभेद मिटविण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी बैठक झाली होती. त्यानंतरही मनभेद कायम असल्याचे शिंदे म्हणाले होते. आता मात्र शिंदे यांच्याच पुढाकारातून बैठक आणि प्रचाराचे नियोजन सुरू झाल्याचे दिसून आले.
महायुतीचे उमेदवार डॉ. विखे पाटील यांच्या निवडणूक प्रचाराच्या नियोजनासाठी आमदार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जामखेडमध्ये बैठक झाली. या कार्यकर्ता मेळाव्यात भाजप कार्यकर्त्यांनी विखे पाटील आणि आमदार शिंदे यांच्यापुढे आपल्या समस्या आणि अडचणी मांडल्या. त्यांना उत्तर देताना डॉ. विखे पाटील यांनी कोणतेही समज गैरसमज उरणार नाही असे आश्वासन दिले. तर आमदार शिंदे यांनी कार्यकऱ्यांशी संवाद साधत विखे पाटील आणि माझ्यात कोणतेही मदभेद राहिले नाहीत. एकदिलाने आणि सर्व ताकदीने डॉ. विखे पाटील यांच्यासाठी काम करायचे आहे, असे सांगितले. प्रचाराच्या नियोजनासंबंधीही मार्गदर्शन केले.

मागील काही दिवसांपासून डॉ. विखे पाटील आणि राम शिंदे यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चा होत होत्या. मात्र मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीतून वाद मिटविण्यात आल्याचे सांगण्यात आले. या पार्श्वभूमीवर आजच्या जामखेडमधील बैठकीकडे लक्ष लागले होते.
बैठकीला विधी आघाडी जिल्हा अध्यक्ष प्रवीण सानप, रवी सुरवसे, सलीम बागवान, शरद कार्ले, बिभीषण धनवडे, डॉ. भगवान मुरूमकर, सोमनाथ राळेभात, संजीवनी पाटील, अजय काशीद, मनीषा मोहलकर, बापूराव ढवळे यांच्यासह विविध गावांचे सरपंच,भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.