भाजप खासदार उन्मेष पाटील हे ठाकरे गटात प्रवेश करण्याच्या चर्चा जोर धरु लागल्या आहेत. मात्र उन्मेष पाटील केवळ संजय राऊत यांच्या भेटीसाठी आले आहेत. काय चर्चा होतील, त्यानुसार पुढील निर्णय घेऊ, असे बोलले जात आहे.
याआधीही, उन्मेष पाटील यांनी ‘मातोश्री’वर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली होती. जळगाव लोकसभा मतदारसंघात स्मिता वाघ यांना भाजपने उमेदवारी जाहीर केल्याने नाराज असलेले उन्मेष पाटील हे महाविकास आघाडीच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
दुसीरकडे, भाजपचे पारोळा-एरंडोल विधानसभा क्षेत्रप्रमुख करण पवारही स्मिता वाघ यांना आव्हान देणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. येत्या दोन दिवसांत ते भाजपला सोडचिठ्ठी देत ठाकरे गटाची मशाल हाती घेणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. खुद्द करण पवार यांनी दोन दिवसांत भूमिका जाहीर करणार असल्याची माहिती ‘मटा’शी बोलताना दिली होती. उद्धव ठाकरे यांनीही करण पवार यांच्या नावाला संमती दिल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे उन्मेष पाटील यांची भूमिका काय असणार, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.