• Sat. Sep 21st, 2024
महाराष्ट्रात यंदाचा उन्हाळा कडक, २० दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा, कोणत्या भागांना यलो अलर्ट?

मुंबई: महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांमध्ये एप्रिल ते जून महिन्यात भीषण उकाडा जाणवू शकतो, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यात तर याच महिन्यापासून लोकांना उष्णतेच्या झळा सोसाव्या लागत आहेत. भारतीय हवामान विभागानुसार, महाराष्ट्रात एप्रिल ते मे महिन्यादरम्यान अधिक उकाडा जाणवेल. राज्यात जवळपास २० दिवस हीट वेव असेल अशीही श्क्यता वर्तवण्यात आली आहे. यादरम्यान हवामान कोरडं पडेल आणि उष्णता इतकी वाढेल की घराबाहेर पडणंही कठीण होईल.

हवामान विभागाने सोमवारी १ एप्रिलला सांगितलं की एप्रिल ते जून यादरम्यान नागरिकांना तीव्र उकाडा सोसावा लागेल. हवामान विभागाचे महानिदेशक मृत्यूंजय महापात्र यांनी सांगितलं की एप्रिल ते जून या कालावधीत महाराष्ट्रासह देशातील बऱ्याच भागात उष्णतेच्या झळा बसणार. यावेळी तापमान सामान्यपेक्षा अधिक असेल. महाराष्ट्राच्या अनेक भागांत २० दिवस उष्णतेची लाट असेल. सामान्यपणे हीट वेवची स्थिती ४ ते ८ दिवसांपर्यंत असते.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या २४ तासात मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात हवामान कोरडं असेल. सध्या दिवसाच नाही तर रात्रीही उष्णता जाणवू लागली आहे. राज्यात धाराशिव, नांदेड, लातूर आणि सोलापूरला उष्ण रात्रीचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकण किनारपट्टी वगळता यंदा राज्यात तापमान सामान्यपेक्षी अधिक असेल.

येत्या काही दिवसात मराठवाड्यासह, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात तापमान सरासरीपेक्षा दोन अंशाने अधिक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाचा उन्हाळा हा अधिक तापदायक ठरणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यात राज्यात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे, त्यामुळे यावेळी अधिक काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तसेच, उष्णतेपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

हाहात होतं तेही गेलं, अवकाळीनंतर जळगावमधले शेतकरी रडकुंडीला

हवामान विभागानुसार, महाराष्ट्रासह गुजरात, उत्तर कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश, ओदिशा, उत्तर छत्तीसगड आणि आंध्र प्रदेशात सर्वाधिक तापमान असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed