निलेश पाटील, जळगाव: अनैतिक संबंधात पती अडसर ठरत असल्याने पत्नीने प्रियकराच्या मदतीने अपघाताचा बनाव करत पतीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी प्रियकरासह पत्नीवर भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील पत्नीला अटक करण्यात आली आहे. किशोर शिवाजी पाटील (वय ४५ रा. पाळासखेडे ता. भडगाव) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
भडगाव तालुक्यातील पळासखेडे येथे किशोर पाटील हे व्यक्ती आपल्या पत्नी पुष्पा पाटीलसोबत वास्तव्याला होते. दरम्यान, किशोरच्या पत्नीचे राजेंद्र शेळके महाराज (रा. आळंदी जि. पुणे) यांच्यासोबत विवाहबाह्य संबंध होते. यामुळे अनेकवेळा या कारणावरून किशोर पाटील आणि पत्नी पुष्पा पाटील यांच्यात वाद होत होते. दरम्यान, अडसर ठरणाऱ्या पतीचा काटा काढण्याचे पत्नी पुष्पा पाटीलने ठरवले. त्यानुसार, प्रियकर राजेंद्र शेळके महाराज याच्या मदतीने तिने प्लॅन आखला. यात प्रियकर राजेंद्र शेळके याने पैसे देण्याचा बहाणा करून किशोर पाटील याला पळासखेडे ते तरवाडे रोडवर बोलावून घेतले.
त्यानुसार, किशोर पाटील हे शनिवार ३० मार्च रोजी सायंकाळी ७.३० वाजता घरातून निघाले. अगोदरच दबा धरून बसलेले राजेंद शेळके याने किशोर पाटीलचा खून केला. त्यानंतर ही घटना अपघात असल्याचा बनाव रचला. हा प्रकार रविवारी ३१ मार्च रोजी मध्यरात्री १.३० वाजेच्या सुमारास उघडकीला आला.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर चाळीसगाव उपविभागीय पोलीस अधिकारी अभयसिंह देशमुख, भडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पांडूरंग पवार यांच्यासह भडगाव पोलीस पथकाने धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा करून ग्रामीण रूग्णालयात मृतदेह नेण्यात आला. तांत्रिक मदतीच्या आधारे पोलिसांनी पत्नी पुष्पा पाटील हिला ताब्यात घेतले. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.