• Sat. Sep 21st, 2024
तिकीट कापण्याची भीती, खासदार भावना गवळींचे समर्थक आक्रमक, पक्षाला थेट धमकी

पंकज गाडेकर, वाशिम : यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघाच्या खासदार भावना गवळी यांची उमेदवारी अद्याप घोषित झाली नाही. त्यामुळे त्यांची उमेदवारी आज तात्काळ घोषित करावी अथवा आम्ही राजीनामे देऊ असा इशारा शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्ते पदाधिकारी यांनी दिला आहे.

लोकसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काही दिवस शिल्लक असताना यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघाच्या शिंदे गटाच्या शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांची उमेदवारी अद्यापही घोषित करण्यात आली नाही. भावना गवळी यांची उमेदवारी तात्काळ घोषित करावी अन्यथा पदाधिकारी कार्यकर्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामूहिक राजीनामे देऊ असा निर्धार करण्यात आला आहे. भावना गवळी यांच्या जनसंपर्क कार्यालयात कार्यकर्ता, पदाधिकारी यांची महत्त्वाची बैठक पार पडली यावेळी हा निर्धार करण्यात आला आहे.
सोशल मीडियावरचा प्रचार आणि खर्चावर निवडणूक आयोग कसं नियंत्रण ठेवणार? वाचा ECI चं नियोजन
भाजपने सर्वे फक्त शिवसेनेच्या मतदार संघात केले का? अमरावती मतदार संघात नवनीत राणा यांना विरोध असताना भाजपने त्यांची उमेदवारी जाहीर केली. खासदार भावना गवळी यांना कोणाचाही विरोध नाही. तसंच यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघात भावना गवळी सतत पाच वेळा निवडून आल्या आहेत. तरी त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही.

सहाव्यांदा त्यांना उमेदवारी देण्याची मागणी केली जात आहे. मात्र भाजपकडून या उमेदवारीला विरोध केला जात आहे. त्यांच्या जागेवर संजय राठोड यांना उमेदवारी देण्याची चर्चा केली जात आहे. मात्र यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघात भावना गवळी यांनांच तिकीट देण्यात यावं. महायुतीने जर दुसऱ्या उमेदवाराला तिकीट दिलं, तर आम्ही सामूहिक राजीनामे देऊ आणि महायुतीने दिलेल्या उमेदवाराचा प्रचारही करणार नाही असा ठराव घेऊन आक्रमक पवित्रा भावना गवळी समर्थकांनी घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed