• Mon. Nov 25th, 2024

    लोकसभेसाठी ‘प्रहार’ची चाचपणी, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडूंचा पदाधिकाऱ्यांसोबत संवाद

    लोकसभेसाठी ‘प्रहार’ची चाचपणी, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडूंचा पदाधिकाऱ्यांसोबत संवाद

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: अमरावती लोकसभा निवडणूक रिंगणात उमेदवार देणाऱ्या प्रहार जनशक्ती पक्षाने आता अन्य मतदारसंघातही चाचपणी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर पक्षनेते आमदार बच्चू कडू यांनी छत्रपती संभाजीनगर विभागातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेत मत जाणून घेतले. यात जालन्यातील भाजपचे उमेदवार विरोधात प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. दरम्यान, ही प्राथमिक बैठक असून कार्यकर्त्यांचा मेळावा घेत निर्णय नंतर जाहीर करू; तसेच जालना येथील खासदारांच्या संदर्भात कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेल्या मत तपासून घेऊ, पाहणी करू असे आमदार कडू यांनी पत्रकारांशी बोलताना नमूद केले.चिकलठाणा विमानतळासमोरील एका सभागृहात शनिवारी आयोजित या बैठकीस छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशीव यासह अन्य जिल्ह्यांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांनी आपआपल्या मतदारसंघाची मुद्दे, अडचणी आदी मांडल्या. त्यात जालना येथील खासदार विकासकामात अडचणी आणतात. प्रहारकडे असलेल्या ग्रामपंचायतीला निधी दिला जात नाही, असा आरोप एका पदाधिकाऱ्यांनी करत निवडणुकीत वेगळा विचार करावा, असे मत मांडले. पदाधिकाऱ्यांनी आपआपले विचार प्रगट केल्यावर पक्षनेते बच्चू कडू यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

    तुमचा येण्याजाण्याचा, हॉटेलचा खर्च करतो, तुम्ही फक्त…; ठाकरेंचं फडणवीसांना ओपन चॅलेंज

    ही प्राथमिक बैठक आहे. भावना जाणून घेतल्या असून, कार्यकर्ता मेळावा घेत पुढील निर्णय घेतला जाईल. जालनाच्या संदर्भात कार्यकर्त्यांनी केलेल्या भाष्यबाबत माहिती घेतली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

    अमरावती येथे मैत्रीपूर्ण लढत आहे. मैत्रीपूर्ण लढावे की महायुतीतून बाहेर जावे, हा निर्णय महायुतीने घ्यावा, ते जे काही निर्णय घेतील ते आनंदाने स्वीकारू, असेही त्यांनी एका प्रश्नावर बोलताना नमूद केले.

    ‘सागर’वर जाऊन शमणार नाही, आम्ही सागराच्या लाटा; बच्चू कडूंचं नितेश राणेंना प्रत्युत्तर

    लोकसभा निवडणुकीत मराठा नेते मनोज जरांगे यांच्यासोबत युती करणार का, यावर बोलताना आमदार बच्चू कडू यांनी जरांगे यांना पाठिंबा देताना राजकीय नाही तर सामाजिक विचार होता. राजकीय बोलणे योग्य वाटत नाही, असे नमूद केले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed