• Mon. Nov 25th, 2024

    मी शरद पवार साहेबांचा ऋणी! जानकरांचं ‘मिशन परभणी’; अजित पवारांच्या वाढणार अडचणी?

    मी शरद पवार साहेबांचा ऋणी! जानकरांचं ‘मिशन परभणी’; अजित पवारांच्या वाढणार अडचणी?

    परभणी: भारतीय जनता पक्ष मित्रपक्षांचा वापर करुन फेकून देतो अशी टीका करणारे राष्ट्रीय जनता पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर नंतर महायुतीत गेले. भाजप सर्वात मोठा असलेल्या महायुतीनं जानकरांना परभणीची जागा सोडली आहे. जानकर १ एप्रिलला त्यांचा उमेदवारी अर्ज करतील. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्या, बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे उपस्थित राहणार असल्याची माहिती खुद्द जानकर यांनी दिली.

    भाजपकडून प्रतिसाद न मिळाल्यानं जानकरांनी शरद पवारांची भेट घेतली. शरद पवारांनी माढ्याची जागा रासपला सोडण्याची तयारी दर्शवली होती. पण नंतर जानकर अचानक महायुतीच्या नेत्यांच्या भेटीला गेले. फडणवीस यांनी समेट घडवून आणला. त्यानंतर जानकरांनी महायुतीत राहण्याचा निर्णय घेतला. महायुतीनं त्यांना एक जागा देण्याची तयारी दर्शवली.
    शिव’तारे जमीन पर’; एक फोन अन् बापूंना साक्षात्कार; तो कॉल कोणाचा? शिवतारेंनी सगळंच सांगितलं
    महादेव जानकरांनी महायुतीसोबत जाण्याचा निर्णय का घेतला यामागची कारणं सांगितली. ‘मी सर्वप्रथम शरद पवार साहेबांचे आभार मानतो. त्यांनी माढ्याची जागा देण्याची तयारी दर्शवली होती. पण महाविकास आघाडीतील अन्य दोन पक्षांनी आम्हाला प्रतिसाद दिला नाही. मी मविआकडे तीन जागा मागितल्या होत्या. माढा, परभणी, सांगली या जागांसाठी मी आग्रही होतो. या तीन जागा मविआतील तीन घटक पक्षांकडे होत्या. पण पवार वगळता अन्य कोणीही मला प्रतिसाद दिला नाही. माझ्याशी चर्चा केली नाही,’ असं जानकरांनी सांगितलं.
    ५ ते ७ वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता! अर्चना पाटील भाजपमध्ये; फडणवीसांनी घटनाक्रम सांगितला
    महायुतीकडे मी दोन जागा मागितल्या. माढा आणि परभणीची मागणी केली होती. त्यातील माढ्याच्या जागेसाठी भाजपनं आधीच उमेदवार जाहीर केला होता. परभणीची जागा सोडण्याची तयारी त्यांनी दर्शवली. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कोट्यात असलेली परभणीची जागा आम्हाला देण्यात आलेली आहे. यासंदर्भात माझी शिंदे, फडणवीस, अजित पवारांशी चर्चा झाली. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत माझ्या ५० टक्के मागण्या पूर्ण केल्या. पण मविआतून केवळ शरद पवारांनी माझ्याशी चर्चा केली. मला एक जागा सोडण्याची तयारीही दर्शवली होती. त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे, असं जानकर म्हणाले.

    भाजपचं एक समीकरण जानकरांना परभणीतून खासदार करण्यासाठी पुरेसं आहे

    जानकरांना परभणी, अजित दादांना अडचणी
    अजित पवारांनी भाजपकडे ९ जागांची मागणी केली होती. पण त्यांना केवळ ६ जागा सोडण्याची तयारी भाजपनं दाखवली. बारामती, शिरुर, रायगड, परभणी, सातारा, धाराशिव असा ६ जागा भाजपनं राष्ट्रवादीला सोडल्या आहेत. पण यासाठी काही अटी, शर्ती घालण्यात आल्या आहेत. पवारांच्या कोट्यातील परभणीची जागा रासपला देण्यात आली आहे. तर सातारा, धाराशिवमध्ये भाजप स्वत:चे उमेदवार देईल. साताऱ्यातून उदयनराजे भोसले, तर धाराशिवमधून माजी सनदी अधिकारी प्रविण परदेशींना तिकीट देण्याची तयारी भाजपनं केली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed