• Mon. Nov 25th, 2024

    निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांची ‘कुंडली’ तयार; अडीच हजार समाजकंटकांवर पोलिस ठेवणार ‘वॉच’

    निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांची ‘कुंडली’ तयार; अडीच हजार समाजकंटकांवर पोलिस ठेवणार ‘वॉच’

    संतराम घुमटकर, बारामती : लोकसभा निवडणूक पारदर्शक पद्धतीने पार पडावी आणि उपविभागातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती चांगली राहावी, यासाठी ग्रामीण पोलिस प्रशासनाने पावले उचलली आहेत. पोलिसांनी बारामती, इंदापूर तालुक्यातील दोन हजार पाचशे गुन्हेगारांची ‘कुंडली’ तयार केली आहे. यामध्ये दोन टोळ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.

    निवडणूक आयोगाच्या सूचना

    लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने केलेल्या आहेत. त्या अनुषंगाने बारामती उपविभागातील बारामती शहर, बारामती तालुका, माळेगाव, वडगाव निंबाळकर, सुपा, इंदापूर, वालचंदनगर, भिगवण पोलिस ठाण्यातील गुन्हेगारांवर कडक उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.

    कारवाई प्रस्तावित

    लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपविभागातील १४३० गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. ‘एमपीडीए’मध्ये दहा जणांचा समावेश करण्यात आला असून, ३९ जणांना तडीपार करण्यात येणार आहे. निवडणुकीच्या काळात टोळ्यांमुळे कायदा आणि सुवस्थेला कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी दोन टोळ्यांचे मकोका प्रस्ताव अंतिम मान्यतेस पाठवण्यात आला आहे. अशा एकूण १६६१ जणांवर कारवाई प्रस्तावित असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांनी ‘मटा’ला दिली.
    पुणेकरांसाठी ‘इलेक्शन डे’ला असणार ‘ड्राय डे’; जिल्ह्यात आचारसंहितेपर्यंत मद्यपरवाने बंद
    लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना निवडणूक विषयक प्रशिक्षण देण्यात आले आहे. आचारसंहितेचे कडक पालन केले जाणार आहे. विविध पथके नियुक्त करण्यात आली आहेत. अंमली पदार्थ पुरवठा, बेहिशेबी अथवा मोठ्या रकमेची वाहतूक, अवैध मद्य उत्पादन आणि वाहतूक विशेष लक्ष ठेवले जाणार आहे.- सुदर्शन राठोड, उपविभागीय पोलिस अधिकारी, बारामती

    निवडणूक तयारी दृष्टिक्षेपात
    महिला मतदार १,७८,०९३
    पुरुष मतदार १,८५,९२६
    तृतीयपंथी २१
    एकूण मतदार ३,६४,०४०
    मतदान केंद्रे ३७९
    पोलिस कर्मचारी, होमगार्ड ८५०
    पोलिस अधिकारी १५०

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *