• Mon. Nov 25th, 2024
    सैनिक भरती पूर्व प्रशिक्षणास मुदतवाढ, उमेदवारांना ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : राज्यातील भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजातील बेरोजगार युवकांना सैनिक भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून अर्जासाठी दहा एप्रिलपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. हे प्रशिक्षण ऑफलाइन स्वरूपाचे असणार आहे.

    महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे (महाज्योती) उमेदवारांना विविध परीक्षांसाठी परीक्षापूर्व प्रशिक्षण दिले जात आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना लष्करातील परीक्षेची माहिती व्हावी यासाठी हे प्रशिक्षण दिले जात आहे. यासाठी महाज्योतीच्या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. प्राप्त झालेल्या अर्जांची निकषानुसार छाननी झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमानुसार चाळणी परीक्षा होईल. या परीक्षेत प्राप्त गुणांकनानुसार गुणवत्तेच्या आधारे विद्यार्थ्यांची यादी व प्रतीक्षा यादी महाज्योतीच्या संकेस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. अर्जदार विद्यार्थ्याचे किमान वय १७ वर्षे व कमाल वय १९ वर्षांहून जास्त असू नये, अशा सूचनाही महाज्योतीने दिल्या आहेत. तसेच ऑनलाइन अर्जाची प्रत आणि आवश्यक कागदपत्रे महाज्योतीच्या कार्यालयात जमा करावे. प्रशिक्षण कालावधीत विद्यार्थ्यांना प्रतिमाह दहा हजार रुपयांचे विद्यावेतन आणि एकवेळ १२ हजार रुपयांचा आकस्मित निधी दिला जाईल.

    वैद्यकीय अर्हता

    उंची—- किमान १५७ सेमी (पुरुष)
    उंची—- किमान १५२ सेमी (महिला)
    छाती—- किमान ७७ सेमी (दीर्घ श्वासानंतर ८२ सेमी) केवळ पुरुषांसाठी
    प्रश्नपत्रिकांचा गोंधळ संपेना; परीक्षा आठ दिवसांवर, पुरेशा प्रश्नपत्रिका मिळण्याबाबत अनिश्चितता
    प्रशिक्षणासाठी अनिवार्य वैद्यकीय पात्रता

    – उमेदवाराचे शरीर मजबूत आणि मानसिक आरोग्य उत्तम असावे
    – छातीचा विस्तार फुगविल्यानंतर किमान ५ सेमी होणे आवश्यक
    – प्रत्येक कानाने सामान्य ऐकणे आणि दोन्ही डोळ्यांमधील दृष्टी उत्तम असावी
    – हाडांची विकृती, हायड्रोसेल आणि व्हॅपिकोकल किंवा मुळव्याध यासारखे रोग नसावे
    – लाल आणि हिरवा रंग ओळखता यावा

    प्रशिक्षणाचे स्वरूप
    – मिलिटरी भरती परीक्षा पूर्व लेखी व शारीरिक परीक्षांचे सुधारित अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण दिले जाणार
    – सहा महिन्यांचा प्रशिक्षण कालावधी असणार
    – प्रशिक्षण अनिवास आणि ऑफलाइन स्वरूपाचे असणार

    आवश्यक कागदपत्रे
    आधारकार्ड, जातीचे प्रमाणपत्र, वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, अनाथ असल्यास अनाथ प्रमाणपत्र, दहावीची गुणपत्रिका

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed