• Mon. Nov 25th, 2024

    शेतीतून वर्षाला ११ लाख, सव्वा चार कोटींची संपत्ती, रामटेकचे नवे काँग्रेस उमेदवार श्यामकुमार बर्वेंची संपत्ती

    शेतीतून वर्षाला ११ लाख, सव्वा चार कोटींची संपत्ती, रामटेकचे नवे काँग्रेस उमेदवार श्यामकुमार बर्वेंची संपत्ती

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर : रामटेक लोकसभा मतदारसंघातून पारशिवनी तालुक्यातील कन्हान कांद्री येथील श्यामकुमार बर्वे यांनी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. ४६वर्षीय बर्वे यांनी आपल्या उत्पन्नाचा स्रोत शेती व शेतीपूरक व्यवसाय असा दाखविला आहे. यातून वर्षाला ११ लाखांपेक्षा अधिक उत्पन्न मिळणाऱ्या बर्वे यांची कुटुंबाची एकूण संपत्ती सव्वाचार कोटींच्या वर आहे.

    अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या रामटेक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचे जातवैधता प्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला. त्यांच्या जागेवर आता त्यांचे पती श्यामकुमार बर्वे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. बर्वे यांचे २०२२-२३ चे वार्षिक उत्पन्न ११ लाख ८ हजार ८०० रुपये आहे. त्यांच्याकडे एकूण संपत्ती ४ कोटी २८ लाख ९४ हजार ९५२ रुपयांच्या घरात असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले. फेसबुक इन्स्टाग्रामवर सक्रिय असणाऱ्या श्यामकुमार बर्वे यांचे शिक्षण बीए द्वितीय वर्ष उत्तीर्णपर्यंत झाले आहे.
    काँग्रेसला मोठा झटका, रामटेक लोकसभा उमेदवार रश्मी बर्वे यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द
    विवरण असे
    -रोख रक्कम : ५० हजार
    -बँकेत ठेवी, शेअर्स, बचत योजना, कार, दागिने आदी : १ कोटी १८ लाख ११ हजार ४३३ रुपये
    -पत्नीच्या नावे : १२ लाख ८३ हजार ५१९ रुपये
    -मुलांच्या नावे : (सुजल आणि भार्गवी) : २१ लाख
    -शेतजमीन, प्लॉटचे बाजारमूल्य : २ कोटी ४१ लाख
    -पत्नीच्या नावे : ३६ लाख
    -शेतजमीन (स्वत: आणि पत्नीच्या नावे) : २१.८ एकर
    -वाहन, गृहकर्ज : १ कोटी ६१ लाख ५२ हजार २९९

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed