• Mon. Nov 25th, 2024
    Lok sabha elections 2024:’एमआयएम’चे ‘वेट अ‍ॅंड वॉच’; राज्यात उमेदवार देण्याचे नियोजन सुरु

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र राज्यात एमआयएमने छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदार संघातून आपला उमेदवार जाहिर केला आहे. राज्यात आणखी पाच ते सहा जागांवर लोकसभा उमेदवार देण्याबाबत एमआयएमचे नियोजन सुरू आहे. मात्र, लोकसभा उमेदवार घोषित करण्यासाठी ‘एमआयएम’ने ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली.

    ‘एमआयएम’चे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदार संघातून इम्तियाज जलील यांची उमेदवारी जाहीर केली आहे. या उमेदवारीनंतर महाराष्ट्रातून एमआयएम पक्ष आणखी काही उमेदवार देणार आहेत का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. एमआयएम प्रमुख ओवेसी यांनी याबाबतचा निर्णय प्रदेशाध्यक्ष तथा खासदार इम्तियाज जलील हे घेतील असे स्पष्ट केले. एमआयएम पक्षाने लोकसभा निवडणुकीपूर्वी काही मतदारसंघांचा आढावा घेतला आहे. या मतदारसंघांमध्ये खासदार ओवेसी यांच्या सभाही झालेल्या आहेत.

    अशा मतदारसंघातून एमआयएम आगामी लोकसभा निवडणुकीत उमेदवार देण्याचे नियोजन करीत आहेत. अशा लोकसभा मतदार संघातील जिल्हाप्रमुख, शहरप्रमुख; तसेच अन्य पदाधिकाऱ्यांकडून प्रदेश कार्यकारिणीच्या वरिष्ठ सदस्यांची एकूण माहिती मागविण्यात आली आहे. या माहितीनंतर या भागातून उमेदवारी देण्याबाबत विचार करण्यात येणार आहे, अशीही माहिती ‘एमआयएम’कडून देण्यात आली आहे.

    राजकारण: औरंगाबादेत MIM चं यंदा काय होणार, खैरे लोकसभेत जाणार? महायुतीचा उमेदवार कोण?
    राजकीय स्थिती स्पष्ट होण्याची प्रतीक्षा

    ‘एमआयएम’च्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या राज्याच्या राजकारणात झालेल्या आघाडी किंवा युतीमध्ये जागा वाटपावरून अनेक जण नाराज आहेत. काही जणांनी पक्ष सोडला तर काही जण सोडण्याच्या तयारीत आहे. नाराजीसत्र वाढू नये. यामुळे अनेक पक्षांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. ही यादी जाहीर झाल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, अशीही माहिती समोर आली आहे.

    धुळे, मालेगावचाही दौरा

    राज्यात धुळे आणि मालेगाव या ठिकाणी ‘एमआयएम’चे दोन आमदार निवडून आले आहेत. या भागांत ‘एमआयएम’चे कार्यध्यक्षांसह पक्षाच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी दौरे केले आहे. या दौऱ्यांचा अहवाल हैदराबादला पाठविण्यात आला असल्याची माहिती ‘एमआयएम’च्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed