• Sat. Sep 21st, 2024

मतदारांना भावनिक आवाहन करताना प्रणिती शिंदेचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघात; म्हणाल्या, खोटं बोलणाऱ्याना मतदान करू नका

मतदारांना भावनिक आवाहन करताना प्रणिती शिंदेचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघात; म्हणाल्या, खोटं बोलणाऱ्याना मतदान करू नका

सोलापूर (इरफान शेख) : काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे सोलापूर लोकसभा मतदारसंघ प्रचार करत पिंजून काढत आहेत.शुक्रवारी सकाळी अक्कलकोट तालुक्यात जाऊन कॉर्नर बैठक घेतली.अक्कलकोट तालुक्यात हैद्रा या गावात मुस्लिम समाजाची दर्गाह आहे.मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी दाखल होतात.प्रणिती शिंदे हैद्रा येथे जाऊन मतदारांशी संवाद साधला. मागील खासदार डॉ जय सिद्धेश्वर महाराज यांना श्रद्धेने मतदान केले होते.मला देखील श्रद्धेने मतदान करा, असे भावनिक आवाहन प्रणिती शिंदे यांनी केले आहे.मागील खासदार स्वामींनी हैद्रा गावासाठी किंवा अक्कलकोट तालुक्यासाठी केलेले एक काम दाखवा मी ताबडतोब खाली बसेन, असे आव्हान प्रणिती शिंदे यांनी केले.

मोदींना भीती वाटत म्हणून केजरीवालांना अटक केली

नरेंद्र मोदी यांनी ‘अब की बार चार सौ पार’, असा नारा दिला आहे. मात्र इंडिया आघाडी मुळे नरेंद्र मोदी घाबरलेले आहेत.’चार सौ पार’ होणार नसून तडीपार होणार आहे. त्यामुळेच केजरीवालांना रातोरात अटक करण्यात आली. काँग्रेसचे बँक खाते गोठवण्यात आली, हे सर्व भीती मुळे करत आहे, असा टोला प्रणिती शिंदे यांनी लगावला आहे.

राम सातपुतेच नाव घेणं टाळले

सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रणिती शिंदे आणि राम सातपुते हे दोघे एकमेकांवर टीका आहेत.सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रणिती शिंदे आणि राम सातपुते हे प्रत्येक बैठकीत एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. शुक्रवारी सकाळी अक्कलकोट येथे काँग्रेसच्या झालेल्या सर्वच बैठकीत आणि भाषणात एक शब्द देखील प्रणिती शिंदे यांनी राम सातपुते यांच्या विरोधात काढले नाही. विकासाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करून प्रणिती शिंदे यांनी भाषण उरकले.अक्कलकोट तालुक्याचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे व इतर पदाधिकारी प्रणिती शिंदेसोबत अक्कलकोट येथील दौऱ्यात उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed