नांदेड : खरेदीसाठी दुचाकीवरून नांदेडच्या दिशेने निघालेल्या एका दाम्पत्यावर नियतीने घात केला. दुचाकीला पाठीमागून आलेल्या कारने धडक दिल्याने दुचाकीवरील पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना काल मंगळवारी दुपारी नांदेड – लातूर मार्गावरील लक्ष्मी पेट्रोल पंपासमोर घडली. राम ज्ञानेश्वर पांचाळ (वय ३४) आणि आलका राम पांचाळ (वय २७) असं मृतांची नावे असून ते मार्कंड येथील रहिवासी आहेत. या घटनेनं गावात शोककळा पसरली आहे.विष्णुपुरी येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाकडे जाणारा नांदेड – लातूर मार्गावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. तसेच रस्त्याच काम सध्या सुरू आहे. मागील काही दिवसांपासून या मार्गावर लहान मोठे अपघात होत आहेत. दरम्यान, नांदेड जवळील मार्कंड येथील रहिवासी राम पांचाळ आणि आलका पांचाळ हे दाम्पत्य काल दुपारी एक वाजताच्या सुमारास खरेदीसाठी म्हणून नांदेडच्या दिशेने दुचाकीवर येत होते.
विष्णुपुरीपासून काही अंतरावर असलेल्या लक्ष्मी पेट्रोल पंपाजवळ येताच भरधाव वेगाने येणाऱ्या कार क्रमांक (एम.एच. २६ बी.एक्स. ००७५)ने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. घटनेनंतर दोघेजण खाली पडल्याने त्यांना गंभीर मार लागला. रक्तभंबाळ झालेल्या राम पांचाळ आणि आलका पांचाळ यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी घटनास्थळी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. घटना घडल्यानंतर कारचालक घटनास्थळी थांबला होता. दरम्यान, त्यांच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ, एक मुलगी, दोन मुलं, असा परिवार आहे. त्यांच्या अपघाती निधनाने मार्कंड गावावर शोककळा पसरली आहे. मुलांच्या डोक्यावरील आई वडिलांचे छत्र हरवल्याने हळहळ व्यक्त होत आहे.