सर्वजण झोपलेले असताना विवेकने रात्री तीन वाजताच्या सुमारास लोखंडी सब्बलने एकापाठोपाठ एक घरातील पाचही सदस्यांच्या डोक्यावर प्रहार करून त्यांची हत्या केली. पोलिसांनी विवेकला अटक केली. या पोलीस निरीक्षक मुकुंद एम. साळुंके यांनी तपासाअंती न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. १५ एप्रिल रोजी सत्र न्यायालयाने या प्रकरणी निर्णय देत विवेकला फाशीची शिक्षा सुनावली होती. की कायम ठेवण्यासाठी राज्य सरकारने उच्च न्यायालयात अर्ज केला होता. तसेच विवेकनेसुद्धा आपल्या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील संजय डोईफोडे यांनी कामकाज पाहिले. फिर्यादी व मृतक कमलाकर पवनकर यांचे वकील ॲड. मोहम्मद अतिक यांनी सरकारी पक्षाला सहकार्य केले. पालटकर यांची बाजू मांडण्यासाठी विधी सेवा प्राधिकरणाने अॅड. देवेंद्र चौहान यांची नियुक्ती केली होती. दोन्ही पक्षांची बाजू ऐकून न्यायालयाने सुमारे तीन महिन्यांपूर्वी या प्रकरणी निकाल राखून ठेवला होता. न्यायालयाने तो आज सुनावला.
सर्वोच्च न्यायालयाच्या नव्या दिशानिर्देशांनुसार, फाशीची शिक्षा सुनावण्यापूर्वी आरोपीत सुधारणेची शक्यता तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र त्याच्यात सुधारणेची शक्यता नसल्याचा युक्तिवाद ॲड. डोईफोडे आणि अतिक यांनी केला. पवनकर कुटुंबीयांना न्याय मिळवून दिल्याचे समाधान असल्याची प्रतिक्रिया जिकार यांनी व्यक्त केली. तसेच हा निकाल ऐतिहासिक असून यामुळे समाजात चांगला संदेश जाईल, असे मत अतिक यांनी व्यक्त केले.
विवेक पालटकर २०१४ साली पत्नीची हत्या केली होती. २०१८ त्याने स्वत:च्या मुलासह पाच जणांची हत्या केली. या सगळ्यांच्या डोक्यावर सब्बलने एकाच ठिकाणी प्रहार करून त्याने त्यांची हत्या केली. त्यानंतर कारागृहात कच्चा कैदी म्हणून असताना त्याने एका दुसऱ्या कैद्याच्या डोक्यावर दगड मारून त्याच्या हत्येचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्याने सगळ्यांच्याच डोक्यावर प्रहार केल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.
न्यायालयाचे निरीक्षण
– गाढ झोपेत असताना आणि असहाय परिस्थितीत असताना त्याने या पाचही जणांवर वार केले.
– त्याने थंड डोक्याने या हत्या केल्यात
– सगळ्यांची विनाकारण हत्या केली.
– त्याची एकंदरित पार्श्वभूमी बघता त्याच्यात सुधारणेची शक्यता नाही.