जळगाव दि. 27 (जिमाका) :- जिल्ह्यातील रावेर व जळगाव लोकसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहिता संदर्भात प्रशासनाने विविध माध्यमातून कार्यवाही सुरू केली असून त्यात शस्त्र जप्ती,रोख रक्कम, दारू, ड्रग्ज, मौल्यवान धातू याबाबतची तपासणी सुरू आहे.
शस्त्र जप्ती
जिल्ह्यात एकूण 1246 परवनाधारक शस्त्र आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शस्त्रे जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दि.26 मार्च रोजी दिले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 05 विनापरवानाशस्त्रे जप्त करण्यात आले आहेत. सीआरपीसीच्या प्रतिबंधात्मक कलमांतर्गत 1 हजार 73 प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत. सी आर पी सी अंतर्गत आतापर्यंत 786 जणांना अटक करण्यात आली आहे.
दारूबंदी
आचासंहिता (16मार्च पासून) कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने नोंदविलेल्या गुन्ह्याचा तपशिल खालीलप्रमाणे.
- एकूण गुन्हे – 78
- जप्त मुद्देमाल (लिटर)- 33506.18
- जप्त मुद्देमाल किंमत (रू) – 11,69,825
सार्वजनिक तक्रार निवारण:
व्होटर हेल्पलाइनद्वारे प्राप्त झालेल्या 53 कॉलचे समाधान करण्यात आले आहे. एकूण 53 कॉल निकाली काढण्यात आले आहेत. वोटर हेल्पलाइन वर प्राप्त होणाऱ्या कॉल्स पैकी बहुतांश तक्रार या मतदान कार्ड न मिळाल्याबाबतीत असल्याने कॉल करणाऱ्या नागरिकांना संबंधित निवडणूक अधिकारी तसेच तहसील कार्यालयांशी संपर्क साधण्याचे सूचित करण्यात आले आहे.
CVIGIL:
CVIGIL अर्जाद्वारे 34 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. प्राप्त झालेल्या प्रमुख तक्रारी परवानगीशिवाय पोस्टर्स/बॅनरशी संबंधित आहेत. प्राप्त बहुतांशी तक्रारी या ठिकठिकाणी लावण्यात आलेले पोस्टर बॅनर्स वॉल पेंटिंग याच्याशी संबंधित असल्याने संबंधित प्राप्त तक्रारींची दखल घेत संबंधित विभागांना सुचित करण्यात आले आहे.
मीडिया:
आता पर्यंत एकूण 2 तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत त्यापैकी 2 तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत.
एन्कोर (ENCORE) अँप
ENCORE अंतर्गत परवानग्यांसाठी 01अर्ज प्राप्त झाला होता तथापि अर्जासंदर्भात त्रुटी पूर्तता करण्यास सूचित करण्यात आले आहे.
00000