Uddhav Thackeray: शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी भरसभेतून अब्दुल सत्तारांविरोधात भाजप कार्यकर्त्यांना साद घातली आहे. भाजपकडून कोणी बोलण्यास आल्यास मी तयार असल्याचं ठाकरे म्हणाले आहेत.
काही दिवसांपूर्वीच भाजपमधून ठाकरेंकडे आलेल्या आणि आता सिल्लोडमधून निवडणूक लढत असलेल्या सुरेश बनकर यांच्यासाठी काल ठाकरेंनी सभा घेतली. बनकर यांच्यासमोर शिंदेसेनेच्या अब्दुल सत्तारांचं आव्हान आहे. सत्तार आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांचं पटत नाही. त्याचा संदर्भ देत ठाकरेंनी भरसभेतून भाजपच्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं. सत्तार यांनी काही महिन्यांपूर्वी शरद पवारांच्या पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंविरोधात आक्षेपार्ह शब्द वापरले होते. त्याचा दाखला देत ठाकरेंनी भाजपच्या कार्यकर्त्यांना आवाहन आणि विनंती केली.
Maharashtra Election Survey: महायुतीला धक्का, विधानसभेला लोकसभेची पुनरावृत्ती होण्याचा अंदाज; सर्व्हेतून आकडे समोर
‘काल त्यांच्या व्यासपीठावर सुप्रिया सुळे ताईंना शिवीगाळ करणारा त्यांचा उमेदवार होता आणि त्याच्या प्रचारासाठी मोदी आले होते. म्हणजेच एकूणच या सगळ्यांचाच स्तर खालावलेला आहे. मी इथे भाजपच्या कार्यकर्त्यांना आवाहन आणि विनंती करतोय, तुमचे आणि आमचे थोडे मतभेद आहेत, असतील. त्याच्या संदर्भात कोणी माझ्याशी येऊन बोलणार असेल तर मी त्याच्याशी बोलायला तयार आहे. पण आता आपण सगळे मिळून सिल्लोडला लागलेला कलंक धुवून टाकूया. ही आपल्याला मिळालेली संधी आहे. कारण आपली संस्कृती आणि आपले संस्कार वेगळे आहेत.
Radhakrishna Vikhe Patil: राहुल गांधींचा ‘तो’ सल्ला न् मी भाजपमध्ये गेलो; शरद पवारांचं नाव घेत विखेंचा मोठा गौप्यस्फोट
अब्दुल सत्तारांना पाडण्यासाठी ठाकरेंनी भाजपच्या कार्यकर्त्यांना साद घातली. सत्तारांची गुंडगिरी मोडून काढण्यासाठी त्यांनी भाजपला आवाहन केलं. याबद्दल माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते रावसाहेब दानवेंनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. ‘आम्ही ठाकरेसेनेच्या पराभवासाठी मतदारांना साद घालत आहोत. सत्तारांची उमेदवारी हा पक्षांतर्गत विषय आहे. त्यावर मी भाष्य करणार नाही,’ असं दानवे म्हणाले.
Uddhav Thackeray: कोणी बोलायला आल्यास मी तयार! ठाकरेंची भरसभेतून भाजपला साद; म्हणाले, ही तर आपल्यासाठी संधी!
दानवे आणि सत्तार यांचं विळ्या भोपळ्याचं नातं सर्वांना माहीत आहे. त्यामुळे सत्तारांच्या पराभवासाठी ठाकरेंना प्रतिसाद देणार का, असा प्रश्न दानवेंना विचारण्यात आला. त्यावर ‘मी राज्य भाजपचा एक प्रमुख नेता आहे. प्रमुख नेता संपूर्ण राज्याचा विचार करतो. तो केवळ एका जागेचा विचार करत नाही. आम्ही महाविकास आघाडीच्या विरोधात आहे. आघाडीतील तिन्ही पक्षांच्या पराभवासाठी आम्ही लढत आहेत, असं दानवेंनी स्पष्टपणे सांगितलं.