• Fri. Nov 15th, 2024

    निवडणुकीतील गैरप्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी विविध पथके

    ByMH LIVE NEWS

    Mar 27, 2024
    निवडणुकीतील गैरप्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी विविध पथके

    रायगड जिमाका दि. 27: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 दरम्यान उमेदवार आणि राजकीय पक्षांच्या निवडणूक खर्चावर आणि निवडणुकीतील गैरप्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्ह्यात 53 भरारी पथके आणि 76 स्थिर सर्वेक्षण पथकांची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली आहे.

    जिल्ह्यातील 32-रायगड आणि 33-मावळ मधील पनवेल, कर्जत, उरण या विधानसभा मतदार संघाअंतर्गत एकूण 53 एफएसटी पथके आणि 76 एसएसटी पथके,  32 व्हीएसटी आणि 8 व्हीव्हीटी पथके स्थापन करण्यात आली आहेत. तर 8 खर्च सनियंत्रण पथके स्थापन करण्यात आली आहेत. यासाठी एकूण 728 अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

    तसेच 188 पनवेल विधानसभा मतदारसंघात 6 भरारी पथके (एफएसटी), 8 स्थिर सर्वेक्षण पथक (एसएसटी), 4 व्हिडीओ सर्वेक्षण पथक (व्हिएसटी), प्रत्येकी 1 व्हिडीओ पाहणी पथक (व्हिव्हिटी) आणि खर्च सनियंत्रण पथक स्थापन करण्यात आले आहे. 189 कर्जत विधानसभा मतदारसंघात 6 भरारी पथके (एफएसटी), 6 स्थिर सर्वेक्षण पथक (एसएसटी), 4 व्हिडीओ सर्वेक्षण पथक (व्हिएसटी), प्रत्येकी 1 व्हिडीओ पाहणी पथक (व्हिव्हिटी) आणि खर्च सनियंत्रण पथक स्थापन करण्यात आले आहे. 190 उरण विधानसभा मतदारसंघात 6 भरारी पथके (एफएसटी), 6 स्थिर सर्वेक्षण पथक (एसएसटी), 6 व्हिडीओ सर्वेक्षण पथक (व्हिएसटी), प्रत्येकी 1 व्हिडीओ पाहणी पथक (व्हिव्हिटी) आणि खर्च सनियंत्रण पथक स्थापन करण्यात आले आहे. 191 पेण विधानसभा मतदारसंघात 7 भरारी पथके (एफएसटी), 21 स्थिर सर्वेक्षण पथक (एसएसटी), 4 व्हिडीओ सर्वेक्षण पथक (व्हिएसटी), प्रत्येकी 1 व्हिडीओ पाहणी पथक (व्हिव्हिटी) आणि खर्च सनियंत्रण पथक स्थापन करण्यात आले आहे. 192 अलिबाग विधानसभा मतदारसंघात 12 भरारी पथके (एफएसटी), 8 स्थिर सर्वेक्षण पथक (एसएसटी), 4 व्हिडीओ सर्वेक्षण पथक (व्हिएसटी), प्रत्येकी 1 व्हिडीओ पाहणी पथक (व्हिव्हिटी) आणि खर्च सनियंत्रण पथक स्थापन करण्यात आले आहे. 193 श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात 10 भरारी पथके (एफएसटी), 15 स्थिर सर्वेक्षण पथक (एसएसटी), 4 व्हिडीओ सर्वेक्षण पथक (व्हिएसटी), प्रत्येकी 2 व्हिडीओ पाहणी पथक (व्हिव्हिटी) आणि खर्च सनियंत्रण पथक स्थापन करण्यात आले आहे. 194 महाड विधानसभा मतदारसंघात 6 भरारी पथके (एफएसटी), 12 स्थिर सर्वेक्षण पथक (एसएसटी), 6 व्हिडीओ सर्वेक्षण पथक (व्हिएसटी), प्रत्येकी 1 व्हिडीओ पाहणी पथक (व्हिव्हिटी) आणि खर्च सनियंत्रण पथक स्थापन करण्यात आले आहे.

    खर्च संनियंत्रणासाठी  निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर खर्च पथक नेमण्यात आले आहे. या पथकाचे काम अन्य विविध पथकांच्या समन्वयाने चालते. भरारी पथक (एफएसटी), स्थिर सर्वेक्षण पथक (एसएसटी), व्हिडीओ सर्वेक्षण पथक (व्हिएसटी), व्हिडीओ पाहणी पथक (व्हिव्हिटी), माध्यम संनियंत्रण आणि प्रमाणीकरण समिती (एमसीएमसी), जिल्हा नियंत्रण कक्ष व तक्रार संनियंत्रण कक्ष आदी देखील खर्च पथकाला सहकार्य करतात. तसेच त्यासाठी आयकर विभाग आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाची देखील या कामात मदत घेतली जाते.

    या पथकांद्वारे मतदारांना प्रभावित करण्यासाठीची रोकड, मद्य, तसेच प्रतिबंधित पदार्थांच्या वाहतुकीस आळा घालणे, आचारसंहिता भंगाबाबत घटनांवर लक्ष देणे, निवडणुकीतील गैरप्रकारांची माहिती घेणे, सिव्हिजिल आणि नियंत्रण कक्षाकडे आलेल्या तक्रारींवर कार्यवाही आदी कामे करण्यात येतात.

    उमेदवार,राजकीय पक्षांच्या प्रचाराच्या सर्व जाहीर सभा, रॅली यांचे व्हिडीओ चित्रीकरण व्हिएसटीच्या माध्यमातून केले जाते व त्याची पाहणी व्हिव्हिटीकडून केली जाते. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात  व्हिएसटी आणि व्हीव्हीटी नेमण्यात आल्या आहेत. या पथकाची निरीक्षणे खर्च पथकासाठी उपयुक्त ठरतात.

    00000

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed