• Fri. Nov 15th, 2024

    नांदेड जिल्ह्यात नामनिर्देशनपत्र पत्र भरायला सुरूवात; उमेदवारांना ४ एप्रिलपर्यत नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची मुदत

    ByMH LIVE NEWS

    Mar 27, 2024
    नांदेड जिल्ह्यात नामनिर्देशनपत्र पत्र भरायला सुरूवात; उमेदवारांना ४ एप्रिलपर्यत नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची मुदत

    नांदेड दि. २७ :- नांदेड लोकसभा मतदार संघामध्ये उद्या दिनांक २८ मार्चपासून नाम निर्देशनपत्र दाखल करण्यात येणार आहे. २८ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहे. छाननी ५ एप्रिलला होईल. अर्ज ८ एप्रिलपर्यंत मागे घेता येईल. तर नांदेड लोकसभा निवडणुकीत नेमके किती उमेदवार हे आठ तारखेच्या रात्री निश्चित होईल.

     

    नांदेड लोकसभा संघाची निवडणूक २६ एप्रिल रोजी घेण्यात येत आहे. त्यामुळे उद्यापासून तर २६ एप्रिलपर्यत निवडणुकीची लगबग सुरू असणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवाराला किंवा त्यांच्या सूचकाला नामनिर्देशनपत्रे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी नांदेड किंवा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी नांदेड यांच्याकडे गुरुवार ४ एप्रिलपर्यत (सार्वजनिक सुट्टी व्यक्तीरिक्त) सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात सादर करता येईल, असे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी कळविले आहे.

    नामनिर्देशनपत्राची छाननी शुक्रवार 5 एप्रिल 2024 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन सभागृह येथे करण्यात येईल. उमेदवारी मागे घेण्याबाबतची सूचना उमेदवारांना सोमवार 8 एप्रिल 2024 रोजी दुपारी 3 वाजेपर्यत देता येईल.

    नांदेड जिल्हयात २६ लक्ष ९७ हजार २८७ मतदार
    नांदेड जिल्ह्यामध्ये २२ मार्च पर्यंत नोंदीनुसार एकूण मतदारांची संख्या २६ लाख ९७ हजार २८७ आहे. एकूण ३ हजार ८१ मतदान केंद्र यासाठी सज्ज झाले आहे. त्यापैकी भोकर, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, नायगाव, देगलूर, मुखेड, या सहा विधानसभा क्षेत्रातील 18.43 लक्ष मतदार नांदेड लोकसभा मतदारसंघात 2 हजार 62 मतदान केंद्रावरून मतदान करणार आहेत. नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी 9 लक्ष 50 हजार 976 पुरुष, तर 8 लक्ष 92 हजार 129 महिला व 139 तृतीय पंथी आपला मताधिकार बजावणार आहेत. नांदेड लोकसभा मतदारसंघांमध्ये 25 हजार 14 मतदार हे 85 वर्ष वयापेक्षा अधिक वयाचे असून त्यांच्यापैकी ज्यांची मतदान केंद्रावर यायची क्षमता नसेल त्यांना बॅलेट पेपरने मतदान करता येणार आहे. प्रशासन त्यांच्या घरी जाऊन मतदान प्रक्रिया पूर्ण करणार आहे.

    तर जिल्ह्यातील किनवट व हदगाव विधानसभा क्षेत्रातील 05.57 लक्ष मतदार 649 केंद्रावरून हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी मतदान करणार आहेत. याशिवाय लोहा विधानसभा क्षेत्रातील 02.92 लक्ष मतदार ३३० मतदार केंद्रावरून लातूर लोकसभा मतदारसंघासाठी मतदान करणार आहेत.

     निवडणुकीचा कार्यक्रम
    निवडणुकीची घोषणा : 16 मार्च 2024
    निवडणुकीची अधिसूचना : 28 मार्च नामनिर्देशनाची अंतिम तारीख : 4 एप्रिल 2024
    छाननी : 5 एप्रिल 2024
    अर्ज मागे घेण्याची तारीख : 8 एप्रिल 2024
    मतदान :26 एप्रिल 2024
    मतमोजणी :4 जून 2024
    0000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed