Devendra Fadnavis on Nawab Malik : नवाब मलिकांना निमंत्रणच नव्हतं, त्यामुळे ते आले असते, तरी त्यांना तसंच परत पाठवून दिलं असतं, असं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या सभेला मी होतो, पण अजित पवार, एकनाथ शिंदे नव्हते. दुसऱ्या सभेला मी आणि एकनाथ शिंदे नव्हतो, तर अजित पवार होते. पुण्यातील सभेलाही अजित पवार होते, मी आणि शिंदे नव्हतो. आम्ही प्रचाराच्या दृष्टीने सभा वाटून घेतल्या आहेत. पंतप्रधान मोदींचंही हेच म्हणणं आहे, की सर्व जण एकाच ठिकाणी रहाल, तर प्रचार कसा कराल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Vikram Nagare : गेम फिरला! भाजपच्या दोन नेत्यांनी पक्ष सोडला, ठाकरे शिवबंधन बांधणार, तोच पोलिसांची मोठी कारवाई
परत पाठवलं असतं
मुंबईतील सभेची वेगळी गोष्ट असते, पण कोणी नेता किंवा उमेदवार आला नाही, तर त्याचं उत्तर तेच देतील, मी कसं देणार? असा प्रतिप्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी केला. नवाब मलिक यांना सभेला प्रवेश नाकारला होता का? असा सवाल केला असता, आम्ही नवाब मलिक यांना निमंत्रणच दिलं नव्हतं, तर सभेला येण्यास नकार देण्याचा प्रश्नच येत नाही, असं फडणवीस म्हणाले. निमंत्रण न देता ते येऊ शकत नाहीत, पंतप्रधानांच्या सभेचं व्यासपीठ आहे, बोलावल्याशिवाय ते काय येतील? नाहीतर आले तसे परत पाठवलं जाईल, असा इशाराच देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
Nawab Malik : मोदींच्या सभेला मलिक निमंत्रणाशिवाय कसले आले असते? आले तसं परत पाठवलं असतं, फडणवीसांचा इशारा
Devendra Fadnavis : २०१९ नंतर राजकारणात काहीच अशक्य नसतं, उद्धव ठाकरेंसोबत… फडणवीसांचं इंटरेस्टिंग उत्तर
अजित पवार यांचं भिन्न उत्तर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतील सभेला झिशान सिद्दीकी, सना मलिक का नव्हते? असा प्रश्न विचारला असता, मीही नव्हतो. प्रत्येक उमेदवार नाही जाऊ शकत. निमंत्रण तर सगळ्यांनाच दिलं जातं, असं म्हणत नवाब मलिकांना निमंत्रण होतं, असं अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे सांगितलं. पुण्यातील सभेलाही २१ उमेदवारांना निमंत्रण होतं, मात्र काही जण आपापल्या प्रचारात व्यस्त होते, त्यामुळे येऊ शकले नाहीत, परंतु त्याची अशी चर्चा झाली नाही, असंही अजित पवार पुढे म्हणाले.