• Mon. Nov 25th, 2024

    आधी ठाकरेंविरोधात निकाल, आता कळीच्या मुद्द्याला हात; नार्वेकरांचं नेमकं चाललंय काय?

    आधी ठाकरेंविरोधात निकाल, आता कळीच्या मुद्द्याला हात; नार्वेकरांचं नेमकं चाललंय काय?

    मुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं १७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पक्षफुटीनंतरही साथ देणाऱ्या, एकनिष्ठ राहिलेल्या पाच खासदारांना ठाकरेंनी पुन्हा तिकीट दिलं आहेत. यामध्ये दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांच्या नावाचाही समावेश आहे. देशातील सर्वात हायप्रोफाईल मतदारसंघ असणाऱ्या दक्षिण मुंबईतून सावंत यांच्याविरोधात कोणाला उमेदवारी मिळणार ते पाहणं महत्त्वाचं आहे.

    मनसे महायुतीत आल्यास दक्षिण मुंबई मतदारसंघ त्यांच्यासाठी सोडण्यात येईल अशी चर्चा आहे. शिवडीचे माजी आमदार बाळा नांदगावकर यांचं नाव मनसेकडून चर्चेत आहे. मनसे-भाजप युतीची चर्चा सुरू होण्याच्या आधीपासूनच विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं नाव दक्षिण मुंबईतून चर्चेत आहे. महालक्ष्मी रेसकोर्स आणि मलबार हिल जलाशय या दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवरुन नागरिकांशी संवाद साधल्यानंतर नार्वेकरांनी मतदारसंघातील आणखी एका संवेदनशील विषयाला हात घातला आहे.
    सेनेची यादी, काँग्रेसची नाराजी; थोरात, वडेट्टीवारांना आठवली आघाडी; राऊत म्हणाले, चर्चा संपली
    पागडी टेनन्ट ऍक्शन कमिटीतर्फे काल मरिन लाईन्समध्ये झालेल्या खुल्या चर्चासत्रात नार्वेकर यांनी हजेरी लावली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. पागडीच्या इमारतींमध्ये वास्तव्यास असलेल्या भाडेकरुंची बाजू ऐकून घेतल्यानंतर नार्वेकरांनी स्थानिक रहिवाशांना वाऱ्यावर सोडणार नाही, असं आश्वासन दिलं. दक्षिण मुंबई मतदारसंघ कोणालाही सुटो, पण नार्वेकरांच्या माध्यमातून या मतदारसंघात तयारी सुरू केलेली दिसते.
    माझ्या कुटुंबात नाशिकची उमेदवारी द्या, अन्यथा…; भुजबळांचा इशारा, नेतृत्त्वावर दबावतंत्र?
    दक्षिण मुंबईत राहणाऱ्या नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना हात घालण्याचं काम भाजपकडून नियोजनबद्ध रितीनं केलं जात आहे. कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार असलेल्या नार्वेकरांनी जनसंवाद मोहीम सुरू ठेवली आहे. मलबार हिल जलाशय, महालक्ष्मी रेसकोर्स याविषयी त्यांनी स्थानिक नागरिकांची बैठक घेतली. आता त्यांनी भाडेकरुंच्या प्रश्नाकडे लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed