• Mon. Nov 25th, 2024
    पवारांना भेटून साथ देण्याच्या आणाभाका, काल महायुतीला पाठिंबा; जानकरांमागे कोण ‘देवा’ला माहिती!

    मुंबई : सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीची धामधूम पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात बारामती लोकसभा मतदारसंघ चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. अशातच महादेव जानकर यांनी मात्र चर्चेचा धुरळा उडवलाय. काही दिवसांपूर्वी चर्चेत नसलेले महादेव जानकर अचानक चर्चेत आले आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष असलेले महादेव जानकर पुण्यामध्ये मागील आठवड्यात शरद पवारांना भेटून गेले आणि तिकडे मुंबईत महायुतीत नकोस झालं. भाजप आम्हाला संपवण्याचा प्रयत्न करतोय, असं महायुतीतील अनेक छोट्या पक्षांचं मत होतं.अशातच महादेव जानकर यांनी आपलं राजकीय कौशल्य पणाला लावून राजकीय खेळी करायला सुरुवात केली. पवारांची भेट घेत त्यांनी मन की बात केली. पण या भेटीमागे करेक्ट कार्यक्रमाची चर्चा पण होती. मात्र, महादेव जानकर यांनी आपला उद्देश साध्य करून घेतला. इकडे मुंबईत वर्षावर येताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी गळाभेट करत जानकरांनी महायुतीमार्फत बारामती लोकसभा लढवण्याचे संकेत दिले.
    इथला असो वा बाहेरचा! शिंदेंच्या ‘स्वागता’ला सातपुतेंचं ‘सामान्य’ उत्तर; दोघांमध्ये लेटरवॉर

    महायुतीतील नेते सदाभाऊ खोत यांनी हातकणंगले मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे यापूर्वी संकेत दिले होते. मात्र, ते त्यांचा संकल्प सिद्धीस नेऊ शकले नाहीत. या अनुषंगाने सागर बंगल्यावरून त्यांना अपेक्षित बळ मिळालं सुद्धा नाही. परिणामी सदाभाऊंना वरचेवर मुंबई गाठावी लागते. पण आमदारकी टर्म संपल्यानंतर राजकीय वरदहस्त सदाभाऊंना कमी पडलेला दिसतोय. रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून आपली ताकद आजमावण्याचा प्रयत्न सदाभाऊ करताना दिसतात. मात्र, त्यांना कितपत यश येईल हे येणारा काळच ठरवेल.

    महादेव जानकर सदाभाऊ खोत किंवा बच्चू कडू हे महायुतीतील नेते लोकसभा निवडणुकीत आम्हाला सन्मानजनक जागा मिळाव्या या दृष्टीने प्रयत्न करत होते. मात्र, महादेव जानकर यात सरस निघाले. त्यांनी अपेक्षित असलेलं त्यांच्या पदरात पाडून घेतलं. शरद पवारांच्या सोबत झालेल्या भेटीनंतर काल मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर फडणवीसांसोबत झालेल्या महादेव जानकर यांच्या गळाभेटीचे फोटो बाहेर येताच नेमकं कुणी कोणाचा करेक्ट कार्यक्रम केला याविषयी प्रसारमाध्यमांत जोरदार चर्चा आहे.

    पुण्याच्या भेटीत शरद पवारांना शेवटपर्यंत साथ देईल, असं आश्वासन दिलेल्या महादेव जानकर यांनी अचानक आपली भूमिका बदलत महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. या बदलत्या भूमिकेमागे नेमकं कोण आहे? हे त्यांना आणि ‘देवा’लाच माहिती अशी जोरदार चर्चा रंगू लागलेली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed