• Sat. Sep 21st, 2024

शिर्डी लोकसभा : तूप घोटाळा काढला, सदाशिव लोखंडेंनी ठाकरेंच्या संभाव्य उमेदवाराला घेरलं

शिर्डी लोकसभा : तूप घोटाळा काढला, सदाशिव लोखंडेंनी ठाकरेंच्या संभाव्य उमेदवाराला घेरलं

मोबीन खान, शिर्डी : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून अनेक मतदारसंघात इंडिया आणि एनडीएचे उमेदवार जाहीर झाले. परंतु राज्यातील अनेक मतदारसंघ असे आहेत, ज्यामध्ये महायुती आणि महाआघाडीमध्ये जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. त्यात शिर्डी लोकसभा मतदारसंघ देखील आहे. महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे यांची उमेदवारी निश्चित मानली जात असून महायुतीकडून मात्र अजूनही ही जागा कुणाकडे, हे निश्चित होत नाहीये. सोमवारी शिंदे गटाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला कामाला लागा असे सांगितले असून शिर्डीत महायुतीचा उमेदवार शंभर टक्के मीच असेल, असा दावा करून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.
कल्याणमध्ये ठाकरेंचं ‘दिघे’ कार्ड? श्रीकांत शिंदेंना शह देण्यासाठी मोठा डाव टाकण्याची तयारी

यावेळी बोलताना लोखंडे पुढे म्हणाले, शिर्डीच्या जनतेने आणि युतीच्या कार्यकर्त्यांनी मागील दोन्ही निवडणुकीत भरघोस मतांनी निवडून दिले. मला मुख्यमंत्र्यांनी पुन्हा कामाला लागा असे आदेश दिलेत. २०२३ ला शेतकऱ्यांच्या शेतात पाणी आणू शकलो. केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून कामे केली. रखडलेली अनेक कामे मार्गी लावली असल्याचे म्हणत मला ४० वर्षांचा राजकीय अनुभव असून मला केंद्रात साईबाबांच्या नगरीतला खासदार म्हणून ओळखतात. साई बाबांच्या नावाचा उपयोग १८२ गावांना पाणी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला. मी निवडणुकीत चपटी आणि पाकीट वाटले नाही तरी जनतेने माझ्यावर विश्वास दाखवला असल्याचे देखील लोखंडे म्हणाले.
महायुतीतून गोडसेंना विरोध; यंदा पत्ता कट? लोकसभा उमेदवारीत भाजप काय करणार?

दहा कोटी नाकारणारा पाहिजे की दहा लाख खाणारा?

तुपामध्ये पैसे खाणारा खासदार पाहिजे का? हे जनतेने ठरवायचंय. वाकचौरेंची ३२ वर्ष प्रशासकीय सेवा झाली. माझी 40 वर्ष जनतेत सेवा आहे. दिल्लीतील स्टिक ऑपरेशनमध्ये मी दहा कोटी रुपये नाकारले होते आणि साईबाबा संस्थानच्या घोटाळ्यात ‘त्यांनी’ दहा लाख खाल्ले. मी त्यांच्यापेक्षा बरा असून लोकांना दहा कोटी नाकारणारा पाहिजे की दहा लाख खाणारा? असा सवाल देखील लोखंडे यांनी उपस्थित करत वाकचौरेंवर टीका केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed