• Sat. Sep 21st, 2024
नाशिक शहराला ३०० वर्षांची दाजीबा मिरवणुकीची परंपरा, धुलीवंदन अनोख्या पद्धतीने होते साजरी

शुभम बोडेकर, नाशिक : नाशिक शहरात अनेक रितीरिवाज या वर्षानुवर्ष पाहायला मिळतात. त्यात प्रामुख्याने धुलीवंदनाचा दिवस हा दाजीबा मिरवणुकीचा अनोखा आविष्कार शहरात नाशिककर मागील ३०० वर्षांपासून अनुभवतात. दाजीबा महाराजांची मिरवणुकीची मागील ३०० वर्षांची परंपरा ही नाशिक शहराला लाभली आहे. धुलीवंदनाच्या दिवशी निघणाऱ्या या मिरवणुकीसाठी हजारो नाशिककर मोठ्या संख्येने या मिरवणुकीत सहभागी होत दर्शनासाठी रांगा लावतात. वाईट प्रवृत्ती नष्ट करण्याचा संदेश देत होळीचा सण पार पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी धुलीवंदनाच्या निमित्ताने ही मिरवणूक शहरभर काढली जाते.३०० वर्षाहून अधिक जुनी ही परंपरा आजही नाशिक शहरात मोठ्या उत्साहाने जोपासली जाते. नवसाला पावणारा दाजीबा महाराज अशी या दाजीबा महाराजांची ओळख आहे. जुन्या नाशकातील दाजीबा विरासह या वीरांची शहरातील मुख्य बाजारपेठांतून ही मिरवणूक काढली जाते. पारंपारिक वाद्याच्या तालावर ही मिरवणूक काढत नाशिककर या मिरवणुकीत सहभागी होतात. आज (२५ मार्च) रोजी देखील ही मिरवणूक शहरात मोठ्या उत्साहात काढण्यात आली. या मिरवणुकीत नाशिककर दाजीबा महाराजांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी करताना पाहायला मिळाले.
मुंबईत जन्म, नागपूरच्या भोसले घराण्याचे दत्तक, याज्ञसेनीराजेंशी विवाह, शाहू छत्रपतींविषयी कधीही न वाचलेली माहिती

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात असलेल्या जानोरी गावात एक गवळी रहात होता. खंडेराव अध्याय दैवत असल्याने गवळी खंडेरायाची भक्ती करत होता. गावात दूध घालून झाल्यावर केवळ ईश्वर सेवेत आपल्या वेळ घालवणे असा त्याचा नित्यक्रम होता. वयाच्या सोळाव्या वर्षी त्याचे लग्न ठरते आणि अंगाला हळद लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी कर्म हीच सेवा म्हणत हा गवळी दूध घालण्यासाठी कावड आणि कुत्र्यांसह निघतो. वाटेतच अज्ञातांकडून त्याच्यावर हल्ला होतो आणि त्या हल्ल्यात त्याचे निधन होते. त्यावेळी दुःखी झालेले कुटुंबीय घरी परतत असताना गावात वाद्य वाजवण्यास सुरुवात होते.

ज्या ठिकाणी गवळी खंडेरायाची पूजा करत होता त्या ठिकाणी त्याची प्रतिमा दिसू लागली आणि बोलूही लागली. त्यांनाच दाजीबा फिर असे म्हणतात. ”अभी जो कोणी माझी राहिलेली इच्छा पूर्ण करेल, त्याची इच्छा मी स्वतः पूर्ण करेल”, असे त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे दाजीबा नवसाला पावणारा असून त्याचे दर्शन घेतल्याने सर्व दुःख दूर होऊन मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात अशी भावना आहे. ३०० वर्षांपासून ही परंपरा जपणारी ऐसाजी महाराजांची मिरवणूक शहरात काढण्यात येते आणि या ३०० वर्षांच्या परंपरेला आजही मोठ्या भक्तीभावाने शहरभर मिरवले जाते.

नाशिक शहरातील ही दाजीबा मिरवणूक मागील ३०० वर्षांची परंपरा असली तरी देखील मात्र आजही या दाजीबा मिरवणुकीसाठी शहरातील नागरिक जुने नाशिक या ठिकाणाहून शहरातील मुख्य बाजारपेठांतून या मिरवणुकीत सहभागी होतात. या मिरवणुकीची सांगता रामकुंड या ठिकाणी होते. त्यामुळे या परंपरेला आजही नाशिककर मोठ्या उत्साहाने जोपासतात आणि आनंदाने ही दाजीबा मिरवणूक नाशिककर साजरी करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed