• Sat. Sep 21st, 2024
कर भरण्यातील कुचराई चांगलीच महागात; नळ कनेक्शन कापले, थेट वाहनावर जप्ती

म. टा. वृत्तसेवा, बुलढाणा : मेहकर नगरपालिका प्रशासनाने पाणी कर, घरपट्टीसह मालमत्ता कर वसुलीसाठी कठोर पावले उचलली आहेत. शहरातील वॉर्ड क्रमांक चारमधील एकाने थकीत कर न भरल्याने त्याच्या मालकीची कार जप्त करून नेण्यात आली. या कारवाईने करबुडव्यांचे धाबे दणाणले आहे. याच्याकडे १ लाख ५ हजारांचा कर थकला होता. कराच्या थकबाकीचा आकडा फुगतच गेला.
अजबच! रंगाने नव्हे, ‘या’ गावात खेळतात दगडांची होळी; रक्तबंबाळ होईस्तोवर होते दगडफेक अन् नंतर…
मात्र, कर भरण्याची फिकिर न बाळगता काय होते, या धारणेवरच तो होता. त्याला अद्दल घडावी म्हणून मागील काळात नळ कनेक्शन कापण्यात आले. तरीसुद्धा काहीही फरक पडला नाही. २१ मार्चला नगरपालिका प्रशासन पुन्हा एकदा ॲक्शन मोडवर आले. पथकाने थेट अंगणात उभी असलेली कारच जप्त करून नेली. मुख्याधिकारी रामराजे कापरे यांच्या आदेशानुसार उपमुख्याधिकारी रवींद्र वाघमारे, सुधीर सारोळकर, अजय चैताने, सय्यद अख्तर, संजय गिरी, संतोष राणे, बाबुराव जाधव, श्रीकांत महाजन, विलास दाभाडे, परमेश्वर गेडाम यांनी ही कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed