होळीनिमित्त लोक आपले मनभेद आणि मतभेद विसरुन एकत्र येतात आणि रंगांच्या धुळीत दुःख, द्वेष विसरुन जातात. मात्र, दरवर्षी फिरणारे ‘होली में रंगों से नहीं, रंग बदलने वाले लोगोंसे डर लगता हैं’, ‘ये होली भी उसके बिना हो-ली’ यासारख्या पोस्ट समाज माध्यमांवर फिरत आहेत. तर मीम पेजेसनीदेखील गंमती-जंमतींच्या पोस्टचा पाऊस पाडायला सुरुवात केली आहे. ‘शोले’ चित्रपटातील ‘कब है होली..?’ हा गब्बरचा चर्चेतील डायलॉग तसेच, काही दिवसांत होळी असणार आहे हे लक्षात घेता काही पोस्टमध्ये गब्बर, ‘गाववालों होली आ गई’, म्हणताना दिसून येत आहे. ‘हेराफेरी’ चित्रपटातील जॉनी लिवर यांचा प्रसिद्ध डायलॉगचा वापर करत, होळी खेळण्यासाठी नवीन कपडे घातलेल्यांना, ‘अरे येडे तेरे बाप की शादी है क्या!’, असा टोला मारला जात आहे.
परदेशी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे ऑनलाइन ऑफिस मिटींगमध्ये दिसणारे अतरंगी चेहरेदेखील मीम्समध्ये अनेकांना हसण्यास भाग पाडत आहेत. ‘भाई बहार आजा, टीका लगाएंगे’, म्हणणारे मित्र जेव्हा पूर्ण रंगवतात, असे गंमतीचे मीम्सदेखील सोशल मीडियावर विशेष पसंत केले जात आहे.
होळी रे होळी… रसायनांची गोळी!
होळीच्या रंगात पूर्वी टेसू, पळसाची पाने व फुलांच्या सहाय्याने होळीचे रंग तयार केले जायचे. मात्र, कालौघात रंगांचा वापर आणि तयार करण्याच्या पद्धतीत बदल झाले. आजघडीला रंगांच्या नावाखाली कितीतरी रसायनांचा वापर असलेले रंग बाजारपेठेत उपलब्ध आहेत. ते दिसायला नैसर्गिक आणि आकर्षक असले तरी त्वचेसाठी तेवढेच धोकादायक आहेत. बरेचदा, आपण आपल्यापरीने नैसर्गिक रंगांचा वापर करायला बघतो. मात्र, बाजारपेठेतून सेंद्रीय रंग किंवा नैसर्गिक गुलाल ओळखणे किंवा खरेदी खूप कठीण आहे. रंगांपासून स्वत:चा बचाव करता आला नाही आला तरी, त्वचा मात्र जपायला हवी. यासाठी काही विशिष्ट गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
होळी खेळण्यास जाण्यापूर्वी
-मॉइश्चराइजर किंवा क्लींजिंग मिल्कचा वापर
-नखांवर नेलपेंट लावावा, ज्याने नख रंगणार नाहीत
-होळी खेळण्याआधी केसांवर तेल लावा
-डोळ्याच्या कड्यांना आय क्रिमचा वापर करावा
– रंग खेळताना जाड सुती कपड्यांचा वापर करावा
होळी खेळून आल्यावर….
-पूर्ण रंग खोबरेल तेलाने काढावा
-आंघोळ करताना शरीरावर साबण लावणे टाळावे
-केसांना शॅम्पू लावणे टाळावे