• Sat. Sep 21st, 2024
भाजपचे सोलापूरमध्ये धक्कातंत्र, दोन ठिकाणी विद्यमान खासदार कायम

सोलापूर : भाजपने महाराष्ट्रातील लोकसभेसाठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये राम सातपुते यांना सोलापुरातून भाजपकडून लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्याता आली आहे. यासोबत महाराष्ट्रातील आणखी दोन उमेदवारांची नावे भाजपने जाहीर केली आहे. भंडारा-गोंदिया मतदारसंघात सुनील मेंढे यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलं आहे. तसेच, गडचिरोली-चिमूर अशोक महादेवराव नेते यांना भाजपने लोकसभेसाठी उमेदवारी दिली आहे.

महाराष्ट्रातील भाजपची तिसरी यादी

सोलापूर – राम सातपुते
गडचिरोली-चिमूर – अशोक महादेवराव नेते
भंडारा-गोंदिया – सुनील बाबुराव मेंढे
मोठी बातमी : कंगना रणौतला भाजपकडून लोकसभेची उमेदवारी, ‘श्रीराम’ही निवडणुकीच्या रिंगणात

नावातच राम असल्याने भाजपला फायदा

राम सातपुते हे मतदार संघात गावोगावी फिरून नागरिकांचे प्रश्न जाणून ते सोडवण्याचा त्यांचा प्रयत्न करत असतात. जरी ते इतर जिल्ह्यातले असले तरी मागील पाच वर्षात त्यांनी सोलापूर जिल्ह्यात आपली चांगली ओळख निर्माण केली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या नावात ‘राम’ असल्याने भाजपला हा मोठा फायदा होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. आता भाजपकडून त्यांना उमेदवारी मिळाल्यावर निश्चितच आमदार प्रणिती शिंदे आणि आमदार राम सातपुते यांच्यातील लढत तितक्याच ताकतीची पाहायला मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed