Satish Salian on Aaditya Thackeray : दिशा सालियनकडे आदित्य ठाकरे यांच्या बेकायदेशीर कृत्यांची माहिती होती. तिने ही माहिती सुशांत सिंग राजपूतला दिली होती; सुशांतने ती रिया चक्रवर्तीशी चर्चा केली, पण रियाने ती माहिती आदित्य ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवली, असा आरोप सतीश सालियन यांनी केल्याचं वकिलांनी सांगितलं
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, एफआयआर नोंदवण्याच्या आणि प्रकरणाचा तपास करण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून सीबीआयने त्यांचा जबाब नोंदवला. तसेच मालवणी पोलिसांकडून २०२० मधील दिशा सालियन हिच्या मृत्यूशी संबंधित कागदपत्रे मागवली.
वकिलांचा गंभीर आरोप
सतीश सालियन यांच्यासोबत त्यांचे वकील निलेश ओझा हे सीबीआय कार्यालयात गेले होते. ओझा यांनी दावा केला की, “दिशा सालियन हिच्यावरील सामूहिक अत्याचार, हत्या आणि हे प्रकरण दाबून टाकण्याच्या कटातील दोषीला फाशीची शिक्षा मिळवून देण्यासाठी आमच्याकडे पुरेसे पुरावे आहेत. तसेच, आमच्याकडे सचिन वाझेची ‘एक्स्ट्रा-ज्युडिशियल कबुली’ (न्यायालयाबाहेर केलेली कबुली) देखील उपलब्ध आहे.”
सचिन वाझेचाही उल्लेख
सचिन वाझे हा वादग्रस्त पोलीस अधिकारी म्हणून ओळखला जातो. २००२ मधील स्फोटातील संशयित ख्वाजा युनूस याच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणात तो बराच काळ निलंबित होता, परंतु २०२० मध्ये करोना काळात त्याला पुन्हा सेवेत घेण्यात आले आणि मुंबई पोलिसांत महत्त्वाचे पद देण्यात आले. त्यानंतर, अँटिलिया बॉम्ब प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली आणि सरकारने त्याला सेवेतून बडतर्फ केले.
Baramati Crime : बारामतीकर तरुणीने घर सोडलं, ओळखीतील तरुणाचा विचित्र दबाव, महिला पोलिसांचं संवेदनशील समुपदेशन, लेक आईच्या मिठीत विसावलीयापूर्वी, माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनीही दिशा सालियन हिची हत्या झाल्याचा आणि त्यात आदित्य ठाकरे यांचा सहभाग असल्याचा आरोप केला होता.
सहा वर्ष जुने प्रकरण
८ जून २०२० रोजी मालाडमधील एका गृहनिर्माण संस्थेच्या आवारात दिशा सालियन हिची बॉडी आढळली होता. मुंबई पोलिसांच्या तपासात तिने जीव दिल्याचे आणि यामागे कोणताही घातपात नसल्याचे निष्पन्न झाले होते. मात्र, “संशयास्पद परिस्थिती” असल्याचा आरोप करत दिशाच्या वडिलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि त्यांच्या मृत्यूचा तपास हत्येचे प्रकरण म्हणून करण्याची मागणी केली.
Nashik Crime : चुलत बहिणीच्या लग्नात पतीकडून अपमान; डॉ मनिषा जेजुरकर यांनी जीव दिला नव्हे, हत्येचा संशय; हायकोर्टाच्या निरीक्षणाने मृत्यू प्रकरणात ट्विस्ट
आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप
सालियन यांचे वकील ओझा यांनी आरोप केला की, “दिशा सालियन हिच्याकडे आदित्य ठाकरे यांच्या बेकायदेशीर कृत्यांची माहिती होती. तिने ही माहिती सुशांत सिंग राजपूत यांना दिली होती; सुशांत यांनी ती रिया चक्रवर्ती यांच्याशी चर्चा करुन सांगितली आणि रिया यांनी ती माहिती आदित्य ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवली. त्यानंतर दिशाचा बॉडी आढळली. हे प्रकरण दाबून टाकण्यात आले.” त्यांनी असाही दावा केला की दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूत यांची प्रकरणे एकमेकांशी जोडलेली आहेत. दिशा सालियान हिचा मृत्यू ८ जून २०२० रोजी मालाडमध्ये झाला, तर अवघ्या सहा दिवसात सुशांत सिंग राजपूत यांचा मृत्यू १४ जून २०२० रोजी वांद्रे येथे झाला. आदित्य यांनी आपली भूमिका कायम ठेवली आहे की, त्यांना यावर काहीही प्रतिक्रिया द्यायची नाही.
