• Sat. Sep 21st, 2024
बारामतीतील जनता त्यांना बरोबर धडा शिकवेल, विजय शिवतारेंचा अजित पवारांवर हल्लाबोल

बारामती: बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी लढवण्याचे मी निश्चित केले आहे. ही लढाई पवार विरुद्ध सामान्य जनता अशी आहे. त्यामुळे लोकांच्या हितासाठी आणि लोकशाही मूल्य जपण्यासाठी ही निवडणूक लढवत आहे. उमेदवारी लढवण्याबद्दल आता मी कोणताही बदल करणार नाही, असे माजी मंत्री विजय शिवतारे म्हणाले. विजय शिवतारे आज इंदापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमाशी संवाद साधला.पुढे बोलताना शिवतारे म्हणाले की, माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री शंभूराज देसाई यांच्याशी चर्चा झाली होती. त्यांना मी सांगितले होते की, बारामती लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेकडे घ्या ही जागा आपण धनुष्यबाणावर लढू आणि इतिहास घडवू. अगदीच असे नाही झाले तर आपल्या परवानगीने भाजपच्या चिन्हावरही ही जागा आपण लढू. मात्र सध्या वेळ कमी असल्याने हा प्रचार दौरा असाच सुरू राहणार असल्याचे शिवतारे म्हणाले.

महायुतीमध्ये या जागेवरून काही तणाव होत असेल आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्रास होत असेल तर मी शिवसेनेपासून विभक्त होऊन बारामती लोकसभेची उमेदवारी लढवेल. थोरले पवार आणि अजित पवार यासारखे मातब्बर नेते आहेत. त्यामुळे मी निवडणूक लढवत असताना त्यांना एवढा काय मोठा त्रास होत आहे. ते माझ्या पक्षालाच ब्लॅकमेल करायला निघाले आहेत. शिवतारे थांबले नाहीत तर आम्ही सगळीकडे उमेदवार उभे करू, असेही शिवतारे म्हणाले.

बारामतीतील जनता यांना बरोबर हा धडा शिकवेल. याची त्यांना खात्री झाली आहे. आज तागायत नुरा कुस्त्या झाल्या. गतनिवडणुकी ही कांचन कुल यांच्या बरोबर झाली. मात्र तरीही लोक साशंक होते. भीत होते. २०१४ ला तर मीच प्रचार प्रमुख होतो. महादेव जानकर यांनी जर कमळाचे चिन्ह घेतले असते तर त्याचवेळी पराभव झाला असता. २०१४ ला मला जरी तिकीट दिलं असतं तरी त्यांचा पराभव झाला असता, असेही शिवतारे म्हणाले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed