• Sat. Sep 21st, 2024

घरोघरी डासांचा प्रादुर्भाव, नागरिक हैराण, महापालिकेकडून तपासणी सुरू

घरोघरी डासांचा प्रादुर्भाव, नागरिक हैराण, महापालिकेकडून तपासणी सुरू

म. टा. प्रतिनिधी, नागपूर: घरोघरी सध्या वाढलेल्या डासांच्या संख्येमुळे नागरिक चांगलेच हैराण असल्याचे दिसून येत आहे. दिवसातील कोणत्याही वेळी होत असलेल्या डासांच्या त्रासाने सध्या नागरिक चांगलेच कंटाळले आहेत. महापालिकेच्या मलेरिया-फायलेरिया विभागाच्या आकडेवारीनुसार शहरात डासांची घनता ६८.२३ टक्क्यांपर्यंत गेली आहे.

यामध्ये क्युलेक्स प्रजातीच्या डासांचे प्रमाण ६७.७८ टक्के इतके आहे. हे डास घरोघरी आढळत असून मनुष्य व प्राण्यांमध्ये आजार पसरण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत. तसेच डेंग्यू, चिकनगुनियासाठी कारणीभूत ठरणारे एडीस डासांचे प्रमाणही वाढले आहे. डासांच्या संख्येत अचानक वाढ झाल्याने महापालिकेच्या मलेरिया आणि फायलेरिया विभागाकडून डासांच्या स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. विभागाच्या आकडेवारीनुसार, एडीस प्रकारच्या डासांची घनता गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यापासून वाढली असून ही मार्च २०२४मध्ये ०.४५ टक्के इतकी वाढली आहे. तर क्युलेक्स प्रकारातील डासांचे प्रमाण ६७.७८ टक्क्यांपर्यंत गेले आहे. क्युलेक्स डास हे मनुष्यासाठी तितकेसे धोकायदायक नसले तरी त्यांच्या प्रभावामुळे रात्रीच्या झोपेवर विपरित परिणाम होत आहे. डासांची संख्या वाढल्याने घरोघरी त्यांच्यापासून दिलासा देणाऱ्या मॉस्किटो रिपेलंट्सचा वापर वाढला आहे. याचा अतिवापर लहान मुले व ज्येष्ठांसाठी धोकादायक मानला जात आहे. डासांची संख्या अचानक वाढण्याची विविध कारणे असून यामध्ये ठिकठिकाणी सुरू असलेली बांधकामे, त्याठिकाणी साचणारे पाणी, अवकाळी पावसामुळे ठिकठिकाणी साचणारे पाणी, ही डासांच्या उत्पत्तीसाठी कारणीभूत ठरत आहे.

तुमच्या मुलाने बलात्कार केलाय, अनोळखी व्यक्तीचा शिक्षकाला फोन, आरोप करत लाखोंची फसवणूक

डासांपासून दिलासा देण्यासाठी महापालिकेने शहरात प्रतिबंधात्मक मोहीम हाती घेतली असून पथकाकडून घरोघरी जाऊन घरांची तपासणी करण्यात येत आहे. घरांमध्ये पाणी साचून राहणाऱ्या ठिकाणांची पाहणी करून त्याठिकाणी फवारणी व इतर उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यातच विविध जनजागृतीपर उपाययोजनाही राबवण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed