• Sat. Sep 21st, 2024
निवडणूक आयोगाचे ‘स्वीप’अभियान, मतदारांमध्ये जनजागृती करा, अडीच हजार सेलिब्रिटींना पत्र

म. टा. खास प्रतिनिधी मुंबई : लोकसभा निवडणुकीत ‘शत प्रतिशत’ मतदान होण्यासाठी मुंबईत सेलेब्रिटी जनजागृती करणार आहेत. यासाठी मुंबईत वास्तव्यास असलेल्या अशा अडीच हजार सेलिब्रिटींना निवडणूक आयोगाने पत्र पाठवून तसेच त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
Career In BCA: कम्प्युटरची आवड आहे? मग ‘बीसीए’ मध्ये करा करिअर; भविष्य बदलेल..लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने मुंबईतील सहा मतदारसंघाशी निगडित दोन जिल्हा निवडणूक कार्यालयात प्रशासकीय तयारी सुरू झाली आहे. निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी सर्व पातळ्यांवर काम सुरू आहेच. मात्र त्याखेरीज मतदारांना जागृत करण्यासाठी ‘स्वीप’ हा स्वतंत्र विभाग कार्यरत आहे. त्याअंतर्गतच सेलिब्रिटींना सामावून घेतले जात आहे.

नवमतदार नोंदणीसह मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी निवडणूक आयोगाने ‘सिस्टीमेटिक व्होटर्स एज्युकेशन अँड इलेक्ट्ररोल पार्टिसिपेशन’ (स्वीप) हे अभियान हाती घेतले आहे. मुंबई शहर व उपनगर, या दोन्ही जिल्ह्यांतील एकूण सहा लोकसभा मतदारसंघांचे ‘स्वीप’साठीचे विशेष समन्वय अधिकारी डॉ. सुभाष दळवी यांनी याबाबत ‘महाराष्ट्र टाइम्स’ला सांगितले की, ‘मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी सेलिब्रेटींनी पुढाकार घ्यावा, यासाठी आवाहन करीत आहोत. त्यासाठीच त्यांना पत्र पाठविण्यात आले आहेत. या सेलिब्रेटींनी त्यांचे सामाजिक माध्यमांची खाती, रेडिओ आदींद्वारे मतदानाचे आवाहन करावे. अथवा मतदान करण्याच्या आवाहनाचा व्हिडीओ आम्हाला पाठवावा व तो आम्ही योग्य मंचावर दाखवून मतदारांना जागरूक करू. अनेक चित्रपट कलावंत, मोठे उद्योजक, प्रभावशाली व्यक्तिमत्व यांना असे आवाहन केले जात आहे.’

समित्यांमध्ये मान्यवरांचा समावेश

मुंबईतील सर्व सहा लोकसभा मतदारसंघांत मतदार जनजागृतीसाठी ‘स्वीप’ची समन्वय समिती जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात तयार स्थापन करण्यात आली आहे. प्रत्येक सरकारी विभागाद्वारे सर्वसामान्यांपर्यंत मतदान जागृती होण्यासाठी विद्यापीठांचे कुलगुरू, शिक्षप उपसंचालक, कामगार आयुक्त, महापालिका अधिकारी अशांना या समितीत घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

१७०० शाळा आणि ४०० कॉलेजेस

मुंबईतील दोन जिल्ह्यांतील सहा लोकसभा मतदारसंघात शाळा-कॉलेजेसपर्यंत निवडणूक आयोग पोहोचत आहे. याअंतर्गत १७०० शाळा व ४०० कॉलेजेसशी संपर्क साधण्यात आला आहे. त्यांच्या माध्यमातून मतदार व मतदान जनजागृतीसाठी भित्तीचित्र, सोशल मीडिया पोस्टर्स, संदेश याद्वारे जनजागृती केली जाणार आहे. ‘स्वीप’ समितींतर्गतच हे काम होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed