• Mon. Nov 25th, 2024

    साताऱ्यात शिरुर पॅटर्न? उदयनराजेंना राष्ट्रवादीची ऑफर; राजे उद्या शहांच्या भेटीला; तिढा कायम

    साताऱ्यात शिरुर पॅटर्न? उदयनराजेंना राष्ट्रवादीची ऑफर; राजे उद्या शहांच्या भेटीला; तिढा कायम

    सातारा: लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम गेल्याच आठवड्यात जाहीर झाला. पण महायुती, महाविकास आघाडीला अद्याप जागावाटप जाहीर करता आलेलं नाही. भाजपनं २० जागांवर त्यांचे उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र २८ जागांवरील उमेदवार अद्याप जाहीर झालेले नाहीत. यातील १० जागांवर तिढा कायम असल्याचं समजतं. सातारा लोकसभा मतदारसंघावर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं दावा सांगितला आहे.

    साताऱ्याचे खासदार राहिलेले उदयनराजे भोसले इथून लढण्यास उत्सुक आहेत. पण सध्या या मतदारसंघात राष्ट्रवादीचा खासदार असल्यानं अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं साताऱ्यावर दावा केला आहे. राष्ट्रवादीनं उदयनराजे भोसले यांना तिकीट देण्याची तयारीदेखील दर्शवली. पण हा प्रस्ताव भोसलेंनी फेटाळला आहे. निवडणूक लढेन तर कमळ चिन्हावरच अशी ठाम भूमिका त्यांना घेतली आहे.
    शिवतारेंना आवरा, अन्यथा आम्ही…; राष्ट्रवादीचा शिंदेंना निर्वाणीचा इशारा, महायुतीत ठिणगी
    उदयनराजे दिल्लीला जाणार, शहांना भेटणार
    साताऱ्यात सध्या शिवेंद्रराजे भाजपचे आमदार आहेत. तर उदयनराजे राज्यसभेचे सदस्य आहेत. छत्रपतींच्या घराण्यातून असल्यानं दोन्ही नावांना वलय आहे. उदयनराजेंना साताऱ्यातून लढायची इच्छा आहे. सध्या मतदारसंघात राष्ट्रवादीचा खासदार असल्यानं ही जागा अजित पवारांच्या पक्षाला सोडण्यात आली आहे. उदयनराजेंनी साताऱ्यातून लढावं, त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवावी असा प्रस्ताव आहे. पण हा पर्याय राजेंनी पूर्णपणे नाकारला आहे. निवडणूक लढवेन तर कमळावरच अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. ते उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची दिल्लीत भेट घेतील. या भेटीत साताऱ्याच्या जागेचा प्रश्न निकाली निघू शकतो.
    दोन पक्ष फोडून आलो! फडणवीस जोशात म्हणाले; शहांच्या दाव्यानं आपल्याच नेत्याला तोंडघशी पाडले?
    साताऱ्यात शिरुर पॅटर्न?
    शिरुरमध्ये सध्याच्या घडीला साताऱ्यासारखीच परिस्थिती आहे. मागील निवडणुकीत पराभूत झालेले माजी खासदार आणि शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील लोकसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक आहेत. पण इथे राष्ट्रवादीचा खासदार असल्यानं ही जागा अजित पवारांच्या पक्षाकडे आहे. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादी लढवेल. अजित पवारांनी इथून आढळरावांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आढळराव लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करतील आणि राष्ट्रवादीकडून लढतील हे स्पष्ट झालं आहे. शिरुरसारख्या घडामोडी साताऱ्यातही पाहायला मिळत आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed