• Mon. Nov 25th, 2024
    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दैवी शक्ती प्राप्त, अजितदादांना साक्षात्कार, पुण्यातलं भाषण चर्चेत

    पुणे : माझ्या राजकीय कारकीर्दीत मी अनेक नेत्यांना पाहिले. परंतु नरेंद्र मोदी असे नेते आहेत ज्यांनी मागील १० वर्षात एकही सुट्टी न घेता देशासाठी अहोरात्र काम केले. एक काळ असा होता की गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांना अमेरिकेने व्हिसा नाकारला पण नंतरच्या काळात असा करिश्मा झाला की नंतर रेड कार्पेट टाकून त्यांचे अमेरिकेने स्वागत केले. आजही जगात त्यांची लोकप्रिय नेता म्हणून ओळख आहे. अशी माणसं सतत जन्माला येत नसतात, ती दैवी शक्ती असते, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करताना भाजप नेत्यालाही लाजवेल असे भाषण ठोकले.राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच महायुतीचे पुणे, शिरूर, बारामती लोकसभा क्लस्टरचे प्रमुख मंत्री चंद्रकांत पाटील आणि महायुतीतील सर्व सहयोगी पक्षांच्या नेते-पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत खडकवासला विधानसभा मतदारसंघाची बैठक आयोजित करण्यात आली होती. याच बैठकीला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचा अजित पवार यांनी न थकता पाढा वाचला. यावेळी मोदींचे कौतुक करताना अजित पवार यांनी कुठेही पुढे मागे न पाहता भाजप कार्यकर्ते-नेत्यांना लाजवेल असे भाषण ठोकले. आजपर्यंत नरेंद्र मोदी हे देवाचे अवतार आहेत, असे भाजप नेते-कार्यकर्ते म्हणायचे पण आज अजितदादांनाही तो साक्षात्कार झाला.
    निलेश लंके सांगा कुणाचे? सुप्रीम कोर्टात शरद पवार-अजितदादांच्या वकिलांत खडाजंगी

    मोदींसारखी माणसं सतत जन्माला येत नसतात, ती दैवी शक्ती असते!

    आम्ही भाजपविरोधात राजकारण केलं, अनेक निवडणुका लढविल्या, परंतु काळानुरूप राजकारण बदलते. शेवटी देशाचे नेतृत्व कुणाच्या हाती द्यायचे हा जेव्हा प्रश्न येतो, तेव्हा साहजिक मोदींचे नाव आपसूक पुढे येते. जगात भारताची शान वाढविण्याचे काम मोदींच्या नेतृत्वाखाली झाले. ज्यांनी (अमेरिका) मोदींना व्हिसा नाकारला त्यांनीच रेड कार्पेट टाकून मोदींचे स्वागत केले. त्यांचे विचार ऐकले. अशी माणसं सतत जन्माला येत नसतात, ती दैवी शक्ती असते, दैवी देणगी असते, असे आश्चर्यकारक विधान अजित पवार यांनी केले.
    तुम्ही CM झाले असते, संग्राम मंत्री झाले असते, पण…. थोपटेंपुढे शिवतारेंनी पवारांच्या अन्यायाचा पाढा वाचला

    आराम शब्द मोदींच्या डिक्शनरीत कुठेही नाही

    पुढे बोलताना ते म्हणाले, मोदींच्या दोन वेळच्या कार्यकाळामध्ये अनेक विमानतळे, नॅशनल हायवे, राज्यात रेल्वेचे जाळे, कोस्टल रोड, अटल सेतू, मेट्रो असे अनेक महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लागले. अशा कितीतरी गोष्टी सांगता येतील ज्यातून आपला आर्थिक स्तर वाढविण्याचा सरकारकडून प्रयत्न झाला. भारताची अर्थव्यवस्था जगाच्या पाठीवर पाचव्या क्रमांकाची आहे, तिला ५ ट्रिलियन डॉलर करून तिला तिसऱ्या क्रमाकांवर आणण्याचे मोदींचे लक्ष्य आहे. त्यांच्याकडे व्हिजन आहे. मी अनेक लोक राजकारणात पाहिले पण मोदींसारखा माणूस पाहिला नाही. १० वर्षात एकही सुट्टी न घेता त्यांनी अहोरात्र काम केले. आपण दिवाळी आपल्या लोकांमध्ये साजरी करतो, परंतु मोदी सीमेवरील सैनिकांमध्ये जाऊन दिवाळी साजरी करतात. आराम शब्द त्यांच्या डिक्शनरीत कुठेही नाही, असे अजित पवार म्हणाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *