• Mon. Nov 25th, 2024
    भावाला ताब्यात घेतलं, नंतर पोलीस ठाण्यातच बहिणीने हातावर केले वार, नेमकं काय घडलं?

    नागपूर: घरफोडीच्या चौकशीसाठी अल्पवयीन भावाला ताब्यात घेतल्याने २३ वर्षीय बहिणीने हातावर ब्लेडने चिरा मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. ही थरारक घटना हुडकेश्वर पोलीस ठाण्यात घडली आहे. या घटनेने पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी जखमी तरुणीला हॉस्पिटलमध्ये दाखल करून तिच्याविरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला.
    उसने घेतलेले पैसे देण्यास विलंब, आधी पाळत ठेवली, नंतर कारागिराचा रक्तरंजित शेवट
    हेडकॉन्स्टेबल विकास रमेशराव इंगळे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला. घरफोडीच्या प्रकरणात हुडकेश्वर पोलिसांना साहिल (२०) हवा होता. पोलीस त्याचा शोध घ्यायला लागले. त्याच्या आईने साहिलला हुडकेश्वर पोलीस ठाण्यात आणले. मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास पोलिसांनी तपास पथक कक्षात त्याची चौकशी सुरू केली. त्याने घरफोडी केल्याचे मान्य केले. घरफोडीतील दागिने अल्पवयीन १६ वर्षीय मुलगा आणि त्याच्या भावाला दिल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी अल्पवयीन मुलगा आणि त्याच्या भावाला चौकशीसाठी ठाण्यात आणले. यावेळी त्यांची बहीणही सोबत आली.

    या म्हणाले तर आमचे सगेसोयरे शेपूट हलवत जातायत, उद्धव ठाकरेंकडून राज ठाकरेंचा समाचार

    साहिलने चोरीचे दागिने दिले. ते नकली असल्याने मी दागिने टिनावर फेकले. दागिने आणून देतो, असे अल्पवयीन मुलाने पोलिसांना सांगितले. याचदरम्यान, त्याची बहीण तपास पथक कक्षासमोर आली. ‘माझ्या भावाला सोडून द्या, त्याने काहीही केलेले नाही, तुम मेरे भाई को गुन्हे मैं क्युं डाल रहे हो, उसका कोई दोष नही हैं’,असे म्हणत ती आरडा-ओरड करायला लागली. याचदरम्यान तिने ब्लेडने आपल्या उजव्या हाताच्या मनगटावर चिरा मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. महिला पोलिसांनी वेळीच धाव घेत तिच्याकडील ब्लेड हिसकावले. तिला मेडिकलमध्ये दाखल केले. पोलिसांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed