• Mon. Nov 25th, 2024
    नागपुरात नितीन गडकरी यांच्या विरोधात काँग्रेस एकवटली

    नागपूर: भाजपने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना नागपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. मात्र, महाविकास आघाडीला अद्याप आपला उमेदवार निवडता आलेला नाही. दरम्यान, काँग्रेसने गडकरींच्या विरोधात तगडा उमेदवार उभा करण्याची तयारी सुरू केली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम नागपूरचे आमदार आणि जिल्हाध्यक्ष विकास ठाकरे हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर निवडणूक लढवताना दिसणार आहे. मात्र, याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. मात्र, मंगळवारी झालेल्या बैठकीत काँग्रेस नेत्यांनी ठाकरे यांच्या नावाला मंजुरी दिल्याचे सूत्रांकडून समजते.लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारी नागपूर काँग्रेसची बैठक झाली. या बैठकीला माजी खासदार विलास मुत्तेमवार, माजी पालकमंत्री सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत, जिल्हाध्यक्ष विकास ठाकरे यांच्यासह सर्व बडे नेते, अधिकारी उपस्थित होते. यादरम्यान आगामी निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराच्या नावावर चर्चा झाली. या बैठकीत आगामी निवडणुकीत नागपूर लोकसभा मतदारसंघातून विकास ठाकरे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला. माजी मंत्री चतुर्वेदी यांनी ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला, तर नितीन राऊत यांच्यासह उपस्थित नेत्यांनी त्यास पाठिंबा दिला. आता नेते ठाकरे यांचे नाव केंद्रीय समितीकडे पाठवतील.
    भाजपसोबत जाऊन राज ठाकरेंनी दिल्लीत झुकलेलं लोकांना आवडणार नाही, फेरविचार करावा, रोहित पवारांचा सल्ला
    नागपुरातील आपले गमावलेले गढ पुन्हा मिळवण्यासाठी आता नेत्यांनी आपसातील मतभेद सोडून नितिन गडकरी यांच्या विरोधात तगडा उमेदवार उभा करण्याची तयारी सुरू केली आहे. या क्रमात तिन्ही नेते बैठकीत एकत्र बसलेले दिसले. एकेकाळी कट्टर प्रतिस्पर्धी विलास मुत्तेमवार, नितीन राऊत आणि सतीश चतुर्वेदी एकत्र आलेले दिसले. माजी खासदार विलास मुत्तेमवार, माजी मंत्री नितिन राऊत आणि सतिश चतुर्वेदी हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहे.

    एकाच पक्षात असूनही हे तिन्ही नेते किंवा त्यांचे कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात काम करताना दिसले. त्याचा परिणाम काँग्रेस पक्षावर दिसून आला. लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीच्या वेळी पक्षांतर्गत सुरू झालेल्या या गटबाजीमुळे काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. २०१४ पासून पक्षाला सतत निवडणूक पराभवाचा सामना करावा लागत आहे. एकेकाळी नागपूर हा काँग्रेसचा मजबूत बालेकिल्ला मानला जात होता, मात्र सध्याच्या परिस्थितीत त्याची अवस्था बिकट झाली आहे.

    युतीचा धर्म पाळावा लागेल, शिंदेंच्या आग्रहानंतर विजय शिवतारे नरमले

    नागपूर लोकसभेच्या उमेदवाराच्या प्रश्नावर माजी मंत्री नितीन राऊत यांनी तरुण आणि मजबूत चेहरा देण्याचा दावा केला आहे. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले, विदर्भात काँग्रेसची लाट सुरू आहे. या जागेवर संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. नागपूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. उमेदवाराच्या प्रश्नावर बोलताना राऊत म्हणाले की, आगामी निवडणुकीत तरुण आणि तगडा उमेदवार देऊ, ज्याला पाहून सर्वांनाच धक्का बसेल.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *