• Mon. Nov 25th, 2024

    एसटीला ‘अष्टविनायक’ पावला! पुणे विभागातून वर्षभरात प्रवाशांसाठी ४३७ फेऱ्या, मिळाले लाखोंचे उत्पन्न

    एसटीला ‘अष्टविनायक’ पावला! पुणे विभागातून वर्षभरात प्रवाशांसाठी ४३७ फेऱ्या, मिळाले लाखोंचे उत्पन्न

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) पुणे विभागाने ‘पॅकेज टुर्स’ अंतर्गत सुरू केलेल्या अष्टविनायक दर्शन सेवेला प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. पुण्यातील १५ आगारांमधून गेल्या वर्षात अष्टविनायक यात्रेसाठी तब्बल ४३७ बसच्या फेऱ्या करण्यात आल्या आहेत. त्यामधून पुणे विभागाला ४२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

    एसटीच्या पुणे विभागाने प्रवाशांच्या सोयीसाठी अगोदर पुण्यातील शिवाजीनगर, पिंपरी-चिंचवड आगारातून अष्टविनायक दर्शन सेवा बस मागणीनुसार सोडण्यास सुरुवात केली होती. त्यानुसार या बसला खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर पुणे विभागातील इतर आगारांमधून अष्टविनायक दर्शन सेवा सुरू करण्यात आली. अष्टविनायक दर्शन सेवा प्रामुख्याने संकष्टी चतुर्थीच्या वेळी आयोजित केली जाते. त्यासाठी आगाऊ आरक्षण करणे बंधनकारक असते. तसेच, मागणी असेल तर इतर वेळीही बस सोडल्या जातात.

    दोन दिवसांचा प्रवास

    प्रामुख्याने दोन दिवस अष्टविनायक दर्शन बसचा प्रवास असतो. एक दिवस ओझर अथवा इतर ठिकाणी बसमधील प्रवाशांचा मुक्काम असतो. या मुक्काचा खर्च प्रवाशांना करावा लागतो. पुण्यातून अष्टविनायक दर्शन सेवेचे साधारण तिकीट ९९० रुपयांपासून सुरू होते. प्रवाशांना राहण्याचा व खाण्याचा खर्च स्वतः करावा लागतो. एसटीने सुरू केलेली अष्टविनायक दर्शन सेवा चांगली लोकप्रिय झाली. गेल्या वर्षभरात तब्बल ४३७ फेऱ्या अष्टविनायक दर्शनासाठी झाल्या आहेत. पुणे विभागातील राजगुरूनगर, नारायणगाव, बारामती, पिंपरी-चिंचवड, शिवाजीनगर, सासवड आगारामधून अष्टविनायक दर्शन सेवेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. बारामती आगारातून एका दिवशी सर्वाधिक अष्टविनायक दर्शनासाठी ४० फेऱ्या केल्या आहेत.
    बारामती आगारातील बस खिळखिळ्या; ब्रेकसाठी लावली वीट, तर काचेला बाटलीचा आधार
    आगारानुसार मिळाले उत्पन्न
    आगार उत्पन्न (रुपये)

    राजगुरूनगर ९,६२,५८८
    नारायणगाव ३,७३,३७०
    शिरूर २४,४२०
    बारामती ६,७९३८८
    बारामती एमआयडीसी ८,१४,०००
    पिंपरी-चिंचवड ५,३४,०००
    सासवड ८,३४,०००

    ४३७
    गेल्या वर्षात अष्टविनायक यात्रेसाठी बसच्या एकूण फेऱ्या

    ~ ४२,२०,०००
    अष्टविनायक दर्शन बसमधून मिळालेले उत्पन्न

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed