• Wed. Nov 13th, 2024
    भीमा शंकर आणि पुण्यातील कसबा गणपतीसह जिल्ह्यातील ७१ मंदिरांबाबत मोठा निर्णय

    पुणे : मंदिरांचे पावित्र्य जपणे आणि आपल्या महान भारतीय संस्कृती प्रसार होण्यासाठी पुणे जिल्ह्यातील ज्योतिर्लिंग श्री. क्षेत्र भीमाशंकर यांसह ७१ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे महाराष्ट्र राज्यातील सुमारे ५२८ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू झालेली आहे, अशी माहिती ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे राज्य समन्वयक सुनील घनवट यांनी दिली आहे.सुनील घनवट पुढे म्हणाले की, पुण्याप्रमाणे यापूर्वीच नागपूर, अमरावती, जळगाव, अहिल्यानगर, मुंबई, ठाणे, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, कोल्हापूर, यांसारख्या अनेक जिल्ह्यातील मंदिरांमध्ये ही वस्रसंहिता लागू करण्यात आलेली आहे. मंदिर महासंघाच्या प्रयत्नांचे स्वागत होत असून केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर कर्नाटक, उत्तराखंड, उत्तर प्रदेशसह देशभरातील अनेक राज्यांमध्ये आणि विदेशातील मंदिरांमध्येही वस्त्रसंहिता लागू करण्याचा स्तुत्य निर्णय तेथील विश्वस्तांकडून उस्फूर्तपणे घेतला जात आहेत.
    ठाकरेंचा विश्वासू शिलेदार, आदिवासींचा चेहरा म्हणून ओळख; आमदार आमश्या पाडवी शिंदे गटात

    वर्ष २०२० मध्ये निधर्मी शासनानेही राज्यातील सर्वच शासकीय कार्यालयात वस्त्रसंहिता लागू केली आहे. देशभरातील अनेक मंदिरे, गुरुद्वारा, चर्च, मशिदी आणि अन्य प्रार्थनास्थळे, खाजगी अस्थापने, शाळा – महाविद्यालय, न्यायालय, पोलीस ठाणे आदी सर्वच क्षेत्रांत वस्त्रसंहितेचे काटेकोर पालन होते. याच धर्तीवर हिंदूंच्या मंदिरांचे पावित्र्य, शिष्टाचार, संस्कृती जपण्यासाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या बैठकीत पुणे जिल्ह्यातील ७१ मंदिरांच्या विश्‍वस्तांनी त्या मंदिरांमध्ये भारतीय संस्कृती अनुरूप वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, असे घनवट यांनी सांगितले.

    महाराष्ट्र शासनाने ‘शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना ‘जीन्स पँट’, ‘टी-शर्ट’, भडक रंगांचे किंवा नक्षीकाम असलेले वस्त्र, तसेच पायात ‘स्लीपर’ वापरण्यावर बंदी घातली आहे. मद्रास उच्च न्यायालयानेही ‘तेथील मंदिरांत प्रवेश करण्यासाठी सात्त्विक वेशभूषा असली पाहिजे’, हे मान्य करून १ जानेवारी २०१६ पासून राज्यात वस्त्रसंहिता लागू केली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed