नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलताना कडू म्हणाले,”सध्या लोकसभेच्या जागांच्या संदर्भात आमच्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही. तसेच जागांबाबत आमच्याकडून कोणत्याही सूचना मागवण्यात आलेल्या नाही. कदाचित त्यांना आमच्याशी बोलण्याची गरज वाटत नाही. आम्ही कमी पडत आहोत म्हणून भाजप आमच्याशी चर्चा करत नाही. ते पुढे म्हणाले, “भाजप जागावाटपासाठी नेतृत्व करत आहे. म्हणून छोट्या पक्षांना विचारण्याची जबाबदारी त्यांची आहे. मात्र, छोट्या पक्षांच्या मागण्या जाणून न घेणे आणि त्यांच्या मतांकडे लक्ष न देणे हे भाजपचे इतिहास आहे.
आम्ही शिंदे यांच्यासोबत आहोत,भाजप सोबत नाही
राज्यात महायुतीच्या सत्तेबाबत बोलताना कडू म्हणाले,“भाजपने एक पाऊल पुढे टाकले पाहिजे. आम्ही १० पावले उचलू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर माझा विश्वास आहे. २० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत आमची खूप बदनामी झाली. पण सरकारमध्ये काम झाले. अपंग मंत्रालयाच्या स्थापनेबद्दल मी समाधानी आहे. सरकार बनवण्यात आमचा मोठा वाटा आहे. आम्ही सरकार स्थापन केले. भाजप आमच्याकडे आला. आम्ही शिंदे यांच्यासोबत आहोत,भाजप सोबत नाही,असेही बच्चू कडू म्हणाले.