• Mon. Nov 25th, 2024

    दारु पिताना वाद, मेहुण्याने दाजीला जागेवर संपवलं, नागपूरमधील छोट्याशा झोपडीत हत्येचा थरार

    दारु पिताना वाद, मेहुण्याने दाजीला जागेवर संपवलं, नागपूरमधील छोट्याशा झोपडीत हत्येचा थरार

    जितेंद्र खापरे, नागपूर : नागपूरच्या बेलतरोडी पोलीस ठाण्यांतर्गत कुटुंबातील किरकोळ वादातून मेहुण्याने आपल्याच दाजीची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. रवी गलीचंद कहार ३० वर्षीय असे मृतकाचे नाव असून तो छिंदवाडा, मध्य प्रदेशातील रहिवासी आहे. तर अरुण अन्नू बनवारी (२४ वर्षे, गोरेघाट, जिल्हा छिंदवाडा मध्य प्रदेश) असे आरोपी मेहुण्याचे नाव आहे.

    हत्येनंतर आरोपी मेहुणा घटनास्थळावरून फरार झाला. या हत्येची माहिती मिळताच बेलतरोडी पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले असून पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील रहिवासी रवी कहार आणि अरुण बनवारी हे बांधकाम मजूर आहे. दोघेही गेल्या महिन्यात कामाच्या शोधात नागपुरात आले होते. रवी हा अरुणच्या बहिणीचा पती आहे. गेल्या काही दिवसांपासून ते बेलतरोडी परिसरात कामाच्या ठिकाणी एका झोपडीत कुटुंबासह राहत होते. दरम्यान, सोमवारी ११ मार्च रोजी रात्री दारु पित असताना दोघांमध्ये कौटुंबिक कारणावरून वाद झाला आणि काही वेळाने त्यांच्या शाब्दिक वादाचे रुपांतर हाणामारीत झाले.

    संतापलेल्या अरुणने रवीवर लाकडी दांड्याने हल्ला केला. रवीला बेदम मारहाण केल्यानंतर काही वेळात रवी रक्ताच्या थारोळ्यात पडला. यानंतर घाबरलेल्या अरुणने मदत करण्याऐवजी तेथून पळ काढला. वेळीच उपचार न मिळाल्याने रवीचा जागीच मृत्यू झाला.

    यानंतर बेलतरोडी पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहचले. मात्र तोपर्यंत आरोपी अरुण घटनास्थळावरून पळून गेला होता. श्याम कहार यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून सध्या पोलीस आरोपी मेहुणा अरुणचा शोध घेण्यासाठी पोलिसांचं एक पथक छिंदवाडा येथे रवाना झाले आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed