पुणे: आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमोल कोल्हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. शिरूर लोकसभा जिंकण्यासाठी त्यांनी विरोधक नाही तर थेट चॅलेंज देणारे अजित पवार यांना धारेवर धरलं आहे. एक दोन नाही तर अनेकवेळा अजित पवार यांच नाव न घेता कोल्हे तिखट शब्दांत प्रहार करत आहे. आजदेखील अजित पवार यांचं नाव न घेता कोल्हे यांनी टीका केली आहे. याआधी सेलिब्रेटी उमेदवार म्हणत अजित पवारांनी अमोल कोल्हेंवर टीका केली होती. याचाच बदला म्हणून कोल्हेंनी आज पुन्हा अजित पवारांना डिवचलं आहे.
अगदीच बोटावर मोजण्याएवढ्या जागा मिळत असल्यामुळे कोल्हे म्हणाले, वाघ गर्जत होते. भाई जब अपने घर मै थे तब वाघ गर्जत होते, पण आताची परिस्थिती पाहून सर्कशीची आठवण येते. गुजराती हंटर वाजला की जे १८ जागा सांगत होते ते ९ वर येणार, जो पक्ष ९ जागा सांगत होते ३ वर येणार, अशी परिस्थिती पाहून कुठल्याही स्वाभिमानी नेत्याला वाटलं पाहिजे, अरे कधी काळी देणारा होतो, आता आज दिल्लीच्या दारात जाऊन मागणार झालो आहे, असं म्हणत अमोल कोल्हे यांनी तिखट शब्दांत अजित पवार यांचा नाव न घेता टीका केली आहे.

शिरूर लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने चेतन तुपेच्या मतदारसंघात अमोल कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीचा मेळावा पार पडला. या मेळाव्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवारचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख संजय मोरे, काँग्रेस शहर अध्यक्ष अरविंद शिंदे आणि अन्य घटक पक्षांचे शहर प्रमुख उपस्थित होते. या मेळावादरम्यान कोल्हे यांनी जागा वाटपासंदर्भात अजित पवारांना निशाण्यावर धरलं आहे.