• Mon. Nov 25th, 2024
    रामदास कदमांची भाजपवर टीका, नारायण राणेंनी दिलं प्रत्युत्तर, वाचा नेमकं काय म्हणाले?

    रत्नागिरी: ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कोकणात राजकीय वातावरण तापले आहे. महायुतीमध्ये जागा वाटपावरून शिवसेना नेते माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी थेट भाजपवर निशाणा साधला होता. केसाने गळा कापण्याचे काम करू नका, अशा शब्दात भाजपला रामदास कदम यांनी सुनावलं होतं. आता या टीकेला भाजपचे जेष्ठ नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. केसाने गळा कापणारे आता फिरत आहेत. आपणच आपले नाव घेऊन काय उपयोग? अशा शब्दांत रामदास कदम यांच्यावर नारायण राणे यांनी प्रहार केला आहे.
    भूपेश बघेल लोकसभेच्या रिंगणात, महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेत्यांना मेसेज, काँग्रेसच्या पहिल्या यादीचा अर्थ काय?
    केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून रामदास कदम यांनी भाजपवर केलेल्या टीकेला शब्दात उत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, आमचे मित्रपक्ष आणि सहकारी यांच्या गळ्यात हार पडावे, त्यांचा सन्मान व्हावा, यासाठी भारतीय जनता पक्ष नेहमी कार्यरत असतो. आम्ही केसाने गळा कापत नाही. केसाने गळा कापणारे आता रानोमाळ फिरत आहेत. आपणच आपले नाव घेऊन काय उपयोग? जनमानसात आपले नाव असले पाहिजे. फांदीवर बसलेल्‍यांनी आव्‍हानाची भाषा करु नये, नाही तर आपल्‍याच फडफडीने फांदी तुटून राम राम म्‍हणण्‍याची वेळ येईल, अशा शब्दात रामदास कदम यांनी केलेल्या टीकेचा राणेंनी समाचार घेतला आहे.

    स्वावलंबी बनण्यासाठी दोन मैत्रिणींची धडपड, एकत्र येऊन उभारला सॅनिटरी पॅडचा व्यवसाय

    आता या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शनिवारी कोकणात दापोली येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेदरम्यान राणे यांनी केलेल्या टीकेला रामदास कदम उत्तर देण्याची शक्यता आहे. रामदास कदम यांनी भाजपवर केलेली टीका आणि उद्या होणारी सभा यामुळे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष या कोकणातील या सभेकडे लागलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना आणि भाजप नेत्यांमधील हे वाकयुद्ध रंगणार की शमणार हे पण महत्त्वाचे ठरणार आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed