• Mon. Nov 25th, 2024
    अभ्यासासाठी म्हणून बाहेर पडला, सगळीकडे शोधाशोध, जुन्या घराचा दरवाजा उघडताच…

    नागपूर: इयत्ता दहावीचा इंग्रजीचा पेपर दिल्यानंतर एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अनूप बंटी सोनटक्के (१६) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. ही घटना गुरुवारी, ७ मार्च रोजी संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास उघडकीस आली. अनूप हा इयत्ता दहावीचा विद्यार्थी होता.
    सिंधुदुर्गमध्ये नवोदय विद्यालयातील ३० विद्यार्थ्यांना विषबाधा, रुग्णालयात उपचार सुरूसध्या दहावीची बोर्डाची परीक्षा सुरू आहे. गुरुवारी दहावीचा इंग्रजीचा पेपर होता. तो इंग्रजीचा पेपर देऊन आला. त्याचे घर जरीपटका परिसरात आहे. मात्र, सध्या तो गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुजरवाडी येथील त्यांच्या जुन्या घरी अभ्यासासाठी म्हणून राहत होता. त्याने घरी आल्यावर गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या वडिलांचा बांधकामाचा व्यवसाय आहे. त्यांच्या हाताखाली काम करणारा एक मजूर काही कामानिमित्ताने या घरी आला. त्याने दरवाजा ठोठावला असताना प्रतिसाद न मिळाल्याने त्याने खिडकीतून डोकावून पाहिले असता अनूपने गळफास लावल्याचे समोर आले. त्याने सुसाईड नोट लिहिलेली नसल्याचे समोर आले आहे. इंग्रजीचा पेपर खराब गेल्याने त्याने आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

    एकेकाळी भंगार गोळा करणाऱ्या मुलीला नवी उमेद दिली, ‘मस्ती की पाठशाला’नं आयुष्य बदललं

    आणखी दोघांची आत्महत्या
    याखेरीज शहरातील विविध दोन घटनांमध्ये दोघांनी आत्महत्या केली. यात हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बँक कॉलनी परिसरात राहणाऱ्या मानसी नरेंद्र मेश्राम (२३) या तरुणीनेसुद्धा राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आली. तसेच यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वनदेवीनगर परिसरातील रहिवासी शेख शाहरूख शेख अब्दूल सलीम (२०) यानेसुद्धा राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. या दोघांच्याही आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तूर्त वरील तिन्ही प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed