• Sat. Sep 21st, 2024

कन्नड साखर कारखाना ED कडून जप्त; सुप्रिया सुळेंनी दिली पहिली प्रतिक्रिया-‘…असे वाटले नव्हते’

कन्नड साखर कारखाना ED कडून जप्त; सुप्रिया सुळेंनी दिली पहिली प्रतिक्रिया-‘…असे वाटले नव्हते’

बारामती : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस युवा नेते व आमदार रोहित पवार यांच्या बारामती ऍग्रो कंपनीने खरेदी केलेला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात असलेल्या कन्नड सहकारी साखर कारखाना ईडीने जप्त करत कारवाई केली आहे.

ईडीने केलेल्या या कारवाईमुळे शरद पवार व रोहित पवार यांना लोकसभेपूर्वी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून सुडाच राजकारण इतकी पातळी गाठेल असे वाटले नव्हते हे अतिशय दुर्देवी आहे.प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणल्या की, सुडाच राजकारण इतकी पातळी गाठेल अस वाटल नव्हतं. एखादा युवक संविधानाच्या चौकटीत राहून भाषण करतो त्याच्यावर सुडाचा राजकारण केलं जातंय हे अतिशय दुर्देवी आहे. दुर्देवी आहे, अदृश्य शक्ती हे फक्त घर फोडा, पक्ष फोडा काही करून सत्तेत या, लोकांचा कल जरी त्यांच्या बाजूने नसला तरी अदृश्य शक्ती ही सर्व एजन्सींचा वापर करून भीती दाखवते हे अतिशय दुर्देवी आहे. हे आपल्या देशाला आणि आपल्या देशाला जिथे लोक तंत्र आहे अगदी विरोधाभास असे आहे, अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी ही कारवाई झाल्याने शरद पवारांना हा धक्का मानला जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात यावर शरद पवार काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

ईडीने बारामती अॅग्रो लि. कंपनीची मालकी असलेल्या कन्नड सहकारी कारखान्याची ५०.२० कोटी संपत्तीवर जप्तीची कारवाई केली. या कारवाईनंतर आमदार रोहित पवार यांनी एक्सवरून प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाले रोहित पवार
ईडीने कारवाई केल्याचे समजल्यानंतर विचार आला आता भाजपामध्ये जायला पाहिजे का? पण भाजपाने लक्षात ठेवावं… झुकणारे आणि रडणारे गेले आता फक्त लढणारे शिल्लक आहेत आणि आम्ही अखेरपर्यंत लढू आणि जिंकू, असे रोहित पवार यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed