• Mon. Nov 25th, 2024

    क्षुल्लक कारणावरुन भांडण, पुतण्यासाठी काकाने जाब विचारला, शेजारच्यांच्या कृत्यानं खळबळ

    क्षुल्लक कारणावरुन भांडण, पुतण्यासाठी काकाने जाब विचारला, शेजारच्यांच्या कृत्यानं खळबळ

    वाशिम: लहान मुलाला मारल्याच्या कारणावरुन झालेल्या वादातून एकाला चाकूने भोसकून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना २ मार्च रोजी रात्री ८ वाजता रिसोड शहरातील अमरदास नगर येथे घडली होती. या घटनेत जखमी झालेल्या १८ वर्षीय सलमान खानचा संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान आज सहाव्या दिवशी मृत्यू झाला आहे.
    साताऱ्यात महिलाराज! जिल्हा परिषदेत ७ महिला अधिकारी, विभागांचा कारभार नारीशक्तीच्या हाती
    मिळालेल्या माहितीनुसार, वाशिमच्या रिसोड शहरातील अमरदास नगर येथील रहिवासी अमिना खातून इम्रान खान यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा ९ वर्षांचा मुलगा मन्सूर खान हा गल्लीत खेळत होता. तो रडत रडत घरी आला आणि त्याने सांगितले कि, फैजान शाहने त्याच्या गालावर चापट मारली. जेव्हा ती आणि तिचा दिर सलमान खानसोबत फैजान शाह अन्वर शाहच्या घरी जाब विचारण्यासाठी गेली असता तिथे पुन्हा वाद सुरू झाला. हा वाद इतका वाढला की, अन्वर शाह, फैजान शाह, रिहान खान, अरबाज खान, शाहबाज खान यांनी सलमान खानला मारहाण करण्यास सुरुवात केली.

    एकेकाळी भंगार गोळा करणाऱ्या मुलीला नवी उमेद दिली, ‘मस्ती की पाठशाला’नं आयुष्य बदललं

    यावेळी फैजान शाह याने जवळील चाकू काढून सलमान खानच्या पोटात वार करून त्याला गंभीर जखमी केले. चौघेही तेथून पळून गेले. या घटनेत जखमी झालेल्या सलमान खानला जखमी अवस्थेत शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याचे पाहून त्याला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे पाठवण्यात आले. छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार करून त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र त्याला वाचवण्यात डॉक्टरांना यश आले नसून अखेर सहाव्या दिवशी त्याची प्राणज्योत मावळली. या घटनेमुळे रिसोड शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेतील चारही आरोपीना अटक केली आहे. पुढील तपास ठाणेदार भूषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी दानडे करत आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed